शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पैशांसाठी पोलिसांकडून पुणे महापालिकेच्या विकासकामांना अडथळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 21:07 IST

ठेकेदार म्हणजे गुन्हेगार आहेत अशी वागणूक...

ठळक मुद्देसर्वपक्षीय नगरसेवकांचा संताप : पोलिसांचे ना-हरकत घेण्यापेक्षा केवळ माहिती द्यावी‘देणे-घेणे’ झाल्यावर पोलीस कशा काय परवानग्या देतात?

पुणे :  पालिकेच्यावतीने केल्या जाणाऱ्या विकासकामांना वाहतूक पोलिसांकडून जाणिवपूर्वक अडथळा आणला जात असून आर्थिक हेतूने पोलिसांकडून ठेकेदारांना दमबाजी करण्याचे प्रकार घडत आहेत. विकासकामांकरित आवश्यक असलेला ना हरकत दाखला द्यायलाही तीन ते चार महिन्यांचा कालावधी लावला जात आहे. त्यामुळे विकासावर परिणाम होत आहे. त्यामुळे पोलिसांचे ना हरकत घेण्याची अट रद्द करुन केवळ माहितीस्तव कळवावे अशी सर्वपक्षीय नगरसेवकांनी मुख्यसभेमध्ये केली. काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी हा विषय सभेपुढे उपस्थित केला. शहरातील रस्ते कोणाच्या मालकीचे आहेत असा सवाल उपस्थित करीत त्यांनी पोलिसांकडून केल्या जात असलेल्या छळवणुकीबाबत माहिती दिली. वाहतूक पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज दिल्यावर पोलीस संबंधित ठेकेदाराला बोलावून घेतात. त्यानंतर त्याच्याकडून निविदा किती रकमेची आहे याबाबत माहिती घेतात. ठेकेदाराचा जबाब लिहून घेतला जातो. ठेकेदार म्हणजे गुन्हेगार आहेत अशी वागणूक दिली जात आहे. तीन ते चार महिने परवानगी देत नसल्याने कामे होत नाहीत. वाहतूक पोलिसांना निविदेच्या रकमांची चौकशी करण्याची आवश्यकता का आहे. त्यामुळे त्यांची परवानगी घेण्याची अट रद्द करुन त्यांना केवळ माहिती देणे आवश्यक करावे अशी मागणी केली. तर शिवसेनेचे गटनेत पृथ्वीराज सुतार म्हणाले, शहरात यामुळे अडचण निर्माण झाली आहे. पालिकेच्या चार ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांची परवानगी आवश्यक आहे का? अंतर्गत रस्ते-गल्ली येथे वाहतूक अडचण येणार नाही अशा ठिकाणी सुद्धा पोलीस अडचणी निर्माण करतात. ना हरकत न मिळाल्याने कामाला विलंब लागतो. अडचणी निर्माण होतात. ड्रेनेज, रस्ते अन्य कामाबाबत हीच तºहा असून दोन वर्षांपासून पोलीस कलव्हर्टच्या कामाला परवानगी देत नाहीत. या गोष्टींची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे.तर, डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले शहरातील पुलांचे जेव्हा स्ट्रक्चरल ऑडिट करुन घेण्यात आले तेव्हा बंडगार्डनचा एक पूल धोकादायक बनला असून त्याचे जॉईन्ट्स बदलावे लागणार असल्याचा अहवाल देण्यात आला आहे. याबाबत वाहतूक पोलीस उपायुक्त यांच्यासह पोलिसांना पत्र दिले आहे. परंतू, अद्यापही परवानगी मिळालेली नाही. ही परवानगी एप्रिल पासून प्रलंबित आहे. वाहतूक उपायुक्त प्रतिसाद देत नाहीत. या कामाची निविदा काढण्यात आल्यानंतर त्याचा कार्यादेशही देण्यात आला आहे. दुरुस्तीचे साहित्यही येऊन पडले आहे. परंतू, वाहतूक उपायुक्त, सहायक आयुक्त आणि निरीक्षकांनी तेथील राज्य शासनाने विकसित केलेले बेट काढा मगच परवानगी देऊ अशी अट घातली आहे. मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी वाहतूक पोलीस ना हरकतीबाबत अडचणी निर्माण करतात. आमच्या प्रभागात ठेकेदाराव गुन्हा दाखल करण्यात आला. हा अंतर्गत रस्ता असून त्याचे आवश्यक काम सुरु आहे. केवळ नगरसेवकाच्या कुटुंबियांशी वाहतूक निरीक्षकांच्या झालेल्या वादातून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. राडारोडा, कचरा उचलणाऱ्या वाहनांना जॅमर लावले जातात. कात्रजमध्ये अशाच ट्रॅक्टरला जॅमर लावल्याने तीन चार दिवस घाणीचे साम्राज्य झाले होते. यासोबतच अ‍ॅड. भैय्यासाहेब जाधव यांनी खराडी, महेंद्र पठारे यांनी रस्त्यांच्या मालकीबाबत तसेच गफूर पठाण यांनी कोंढव्यातील ड्रेनेज लाईन संदर्भात पोलिसांनी केलेल्या अडवणुकीचा पाढा वाचला. विरोधी पक्षनेते दिलीप बराटे म्हणाले, पोलिसांच्या अडवणुकीचा नेहमी प्रत्यय येतो. पोलीस ठेकेदार, पालिका अधिकारी यांना त्रास देतात. प्रशासनाने काम सुरु करण्यापुर्वी पोलिसांना कळवाव जेणेकरुन ते विनाकारण त्रास देणार नाहीत. पोलिसांमुळे कामांना वेळ लागला तर अंदाजपत्रकातील तरतूद वाया जाईल. वाहतूक पोलीस वाहतूक नियमन आणि नियोजन सोडून भलतीच कामे करतात. पालिकेने पुरविलेल्या वॉर्डन्सनाही भलतीच कामे सांगितली जातात. विकासकामांमध्ये पोलिसांचा अडथळा होता कामा नये. पोलिसांनी प्रशासनाला विचारावे. ठेकेदाराकडे विचारणा करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला.  

‘देणे-घेणे’ झाल्यावर पोलीस कशा काय परवानग्या देतात?त्यावर महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि ठेकेदारांना पोलिसांचा होत असलेला त्रास गंभीर आहे. याबाबत सर्वांच्याच भावना तीव्र आहेत. नगरसेवकांचा विकासकामे व्हावीत असा उद्देश आहे. याबाबत आयुक्त सौरभ राव यांनी पोलीस आयुक्तांशी चर्चा करुन निर्णय घ्यावा. यासंदर्भात बैठक घ्यावी. पोलिसांचे ना हरकत घेण्याची आवश्यकता नाही. केवळ त्यांना कामाची माहिती कळवावी. याबाबत त्वरीत पोलीस आयुक्तांशी बोलून पालिकेच्या कामांना अडथळा होऊ नये अशी दक्षता घेण्याचे आदेश महापौरांनी आयुक्तांना दिले. तसेच याबाबतचे परिपत्रक तात्काळ काढण्याचेही आदेश दिले.  

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाBJPभाजपाPoliceपोलिस