शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तीन मंत्र्यांनी शिफारस केलेला 'तो' पोलीस हवालदार निघाला लाचखोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 22:14 IST

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल

पुणे : गृहमंत्री अनिल देशमुख, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी बदलीसाठी शिफारस केलेला पोलीस हवालदार लाचखोर निघाला आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेची मागणी केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलीस हवालदार विलास तोगे असे याचे नाव आहे. सध्या तो वारजे पोलीस ठाण्यात नेमणूकीला आहे. विलास तोगे याची अगोदर वारजे पोलीस ठाण्यातून पोलीस मुख्यालयात बदली झाली होती. त्यानंतर तेथून पुन्हा वारजे पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली. आपली भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात बदली व्हावी, यासाठी त्याने प्रयत्न सुरु केले होते. आईवडिल आजारी आहेत. त्यांना वेळ देता यावा यासाठी बदली करावी, अशी विनंती त्याने केली होती.त्यासाठी त्याने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे शिफारस पत्र जानेवारी महिन्यात मिळवले होते. तसेच गृहराज्यमंत्री सतेज पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही त्याला शिफारसपत्र दिले होते. मात्र, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी मंत्र्याची शिफारस असतानाही त्याची बदली गेल्या ६ महिन्यात केली नाही.वारजे येथे एका दुकानावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली कारवाई करण्यात आली होती. या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी व दुकानदाराचा पोलिसांच्या ताब्यात असलेला डी व्ही आर परत करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी ३८ हजार रुपये त्याने अगोदर घेतले. उरलेले १२ हजार रुपये देण्यासाठी तोगे याने दुकानदाराकडे तगादा लावला होता. तेव्हा दुकानदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यांनी केलेल्या पडताळणीत विलास तोगे याने १२ हजार रुपयांची मागणी केल्याचे आढळून आले. मात्र, त्यानंतर सापळा कारवाई न झाल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेची मागणी केल्याबद्दल त्याच्याविरुद्ध वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता़ तेव्हापासून विलास तोगे हा फरार आहे. तो कामावरही आलेला नाही. लाच लुचपत प्रतिबंधक विभाग त्याचा शोध घेत आहे.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखDhananjay Mundeधनंजय मुंडे