शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
6
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
7
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
8
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
9
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
10
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
11
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
12
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
13
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
14
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
15
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
16
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
17
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
18
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
19
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
20
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई

शहरातील सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 02:23 IST

भारत तरुणांचा विकसनशील देश आहे. आजचे तरुण हे देशाच्या विकासाचे उज्ज्वल भविष्य आहे. देशातील गुन्हेगारी, वाहतुकीचे नियम, सार्वजनिक सुव्यवस्था यासाठी पोलीस सज्ज आहेत.

पुणे : भारत तरुणांचा विकसनशील देश आहे. आजचे तरुण हे देशाच्या विकासाचे उज्ज्वल भविष्य आहे. देशातील गुन्हेगारी, वाहतुकीचे नियम, सार्वजनिक सुव्यवस्था यासाठी पोलीस सज्ज आहेत. परंतु, एक तरुण म्हणून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी नववर्षाच्या सुरुवातीपासूनच शिस्त आणि नियमांचे पालन करावे, असे मत पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी व्यक्त केले.सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथे पुणे पोलीस आयुक्तांचा विद्यार्थ्यांशी संवाद कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी प्राचार्य डॉ. दिलीप शेठ, शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष अ‍ॅड एस. के. जैन, उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, सदस्य वसंत देसाई, रणजित नातू आदी उपस्थित होते.व्यंकटेशम म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांना लायसन काढताना वाहतुकीसंदर्भात असणारे सर्व नियम आखून दिले जातात. त्या नियमात हेल्मेट वापरण्याचे नियमही देण्यात आले आहेत. आम्ही १ जानेवारीपासून हेल्मेटसक्ती ही मुलांच्या सुरक्षितेतसाठी केली आहे. पुण्यात गुन्हेगारी, आर्थिक अडचणी, सायबर क्राईम अशा घटनांना समाजाला सामोरे जावे लागत आहे. पुणे पोलीस या गोष्टींसाठी खंबीरपणे उभे आहेत. विद्यार्थ्यांनी नवीन वर्षात आपल्या भविष्याचा विचार करावा.‘‘नियम व शिस्तीचे पालन करावे. समाजात फसवेगिरी टाळून त्यात बदल घडवून आणणे हे तरुणांचे काम आहे. पुणे, महाराष्ट्रात आपले पोलीस मित्र समाजाच्या सरंक्षणासाठी सज्ज आहेत. विद्यार्थ्यांनीसुद्धा यासाठी हातभार लावला पाहिजे.’’मुलींच्या दृष्टीने त्यांच्या संरक्षणसाठी पोलीस काका, प्रतिसाद, बडीकॉप, ही अ‍ॅप देण्यात आली आहेत.मुलींनी या अ‍ॅपचा निर्धास्तपणे वापर करावा. नवीन वर्षात गुन्हेगारी, नागरी समस्या सोडविण्यासाठी पोलीस नक्कीच प्रयत्नकरतील. तरी सर्वांनीपोलिसांना सहकार्य करावे, असे ते म्हणाले.डॉ. के. व्यंकटेशम हे खूप वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी केलेल्या अमूल्य मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे. शिस्त व नियम याबरोबरच करिअरकडे लक्ष देणे फारच महत्त्वाचे आहे. समाजात बदल घडवून आणायचे असतील, तर तरुणांनी समाजाच्या दृष्टीने सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे.- डॉ. दिलीप शेठजास्तीत जास्त तरुणांनी सहभागी व्हावेसध्याची तरुणाई करिअरकडे लक्ष न देता व्यसनाधीन होत आहे. तुम्ही व्यसनाच्या नादी न लागता करिअरच्या दृष्टीने योग्य मार्गाचा अवलंब करावा. देशाच्या संरक्षणसाठी पोलीस होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पोलीस क्षेत्रात हवालदारपासून कमिशनरपर्यंत उत्तम पेमेंट आहेत. पोलीस खात्यातील हवालदाराला ३.५ लाखांचे पॅकेज मिळत आहे. तसेच, ही आदरयुक्त पोलीस पोशाख घालण्याची संधीही मिळत आहे. या क्षेत्रात जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी व्हावे.सर्व विद्यार्थ्यांनी पोलीस खात्यातील अनुभवी व्यक्तीशी संवाद साधला आहे. विद्यार्थ्यांनी डॉ. व्यंकटेशम यांच्यासारख्या अनुभवी व्यक्तींचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवावा. हे भविष्यात आपल्याला उत्तम दिशा मार्ग दाखवतील.- अ‍ॅड. एस. के. जैन

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस