शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Police Commemoration Day : पोलीस हुतात्मा दिनानिमित्त बुधवारी श्रद्धांजली; संचलनाद्वारे मानवंदना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 13:38 IST

२१ ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृतिदिन म्हणून देशभर पाळला जातो.

ठळक मुद्देपाषाण येथील पोलीस संशोधन केंद्रात उभारण्यात आला पोलीस स्मृति स्तंभ या कार्यक्रमाला विभागीय आयुक्त सौरभ राव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार

पुणे : पोलीस हुतात्मा दिनानिमित्त पाषाण येथील पोलीस संशोधन केंद्रात २१ ऑक्टोबर रोजी हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी संचलन आयोजित करुन त्यांना मानवंदना देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला विभागीय आयुक्तसौरभ राव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. २१ ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृतिदिन म्हणून देशभर पाळला जातो. 

१ सप्टेंबर २०१९ ते ३१ ऑगस्ट २०२० या कालावधीत देशातील सर्व राज्यात पोलीस दलाचे २६४ पोलीस अधिकारी आणि पोलीस जवान आपले कर्तव्य बजावत असताना धारातीर्थ पडले.त्यामध्ये महाराष्ट्रातील पोलीस उपनिरीक्षक धनाजी तानाजी होनमाने, पोलीस निरीक्षक रितेश देवराओजी भोपरे, पोलीस नाईक सुनिल महादेव मेश्राम, पोलीस नाईक शहाजी बाबुराव हजारे, पोलीस शिपाई किशोर लक्ष्मण आत्राम या ५ जवानांचा समावेश आहे. 

२१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाख भागातील सरहद्दीवर १८ हजार फुट उंचीवर हॉट स्प्रिंग्ज या ठिकाणी भारतीय जवान गस्त घालत होते. तुकडी नेहमीप्रमाणे गस्त घालत हॉट स्प्रिंग्जच्या पूर्वेला ६ मैल दूर आली असताना पर्वताच्या डावे बाजूला तुकडीच्या नेत्याला काही संशयास्पद खुणा दिसल्या. त्या दिशेने तुकडी जात असताना अचानक भयानक गोळीबार सुरु झाला. त्या ठिकाणी पोलीस वीरांनी शौर्याने त्याला तोंड दिले.या लढाईत १० शिपायांना वीर मरण आले व ९ जण जखमी अवस्थेत शत्रुच्या हाती सापडले. त्यावेळी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या छावणीवरही अचानक चिनी सैन्यांनी हल्ला केला होता. १३ नोव्हेंबरला चिनी सैनिकांनी या हुतात्म्यांचे मृतदेह भारताच्या ताब्यात दिले. त्यांच्यावर हॉट स्प्रिंग्ज येथे सन्मानपूर्वक अंत्यविधी करण्यात आले. त्यावेळी प्रत्येक राज्यातील पोलीस दलांनी त्या त्या ठिकाणी या वीरांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर पाटणा येथे १९५९ साली झालेल्या अखिल भारतीय पोलीस स्पर्धाच्यावेळी सर्वांनी आमच्या ह्या वीर हुतात्म्यांचे स्मरण आम्ही दरवर्षी २१ ऑक्टोबरला पोलीस हुतात्मा दिन पाळू करु़ अशी शपथ घेतली आणि तेव्हापासून सर्व राज्यातील पोलीस दले या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी संचलन आयोजित करुन त्यांना मानवंदना देतात.पाषाण येथील पोलीस संशोधन केंद्रात पोलीस स्मृति स्तंभ उभारण्यात आला आहे. तेथे दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसSaurabh Raoसौरभ रावcommissionerआयुक्त