शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आता बोला! बारामतीतच उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली; पोलिसांचे भर चौकात ‘बर्थ डे सेलिब्रेशन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2021 15:09 IST

बारामती एमआयडीसी चौकात हा केक कापतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बारामतीबारामती शहरात कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी निर्बंध लादलेले आहेत. कोरोना निर्बंध सुरु असताना भर चौकात पोलीसांनी केक कापत वाढदिवस साजरा केल्याचा प्रकार उघड झाला आहे.केक कापतानाचे छायाचित्र व्हायरल झाल्याने बारामतीकरांकडुन संताप व्यक्त होत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पोलिसांवर कारवाई होणार का असा सवाल व्यक्त होत आहे.

सध्या बारामती गेल्या काही दिवसांपासुन निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, कोरोनाबाधितांची अपेक्षित संख्या कमी होण्यास तयार नाही.कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ,कोरोनाची साखळी ‘ब्रेक’ करण्यासाठी ५ एप्रिल पासुन बारामतीत सर्वच दुकाने बंद होती. कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्यानंतर ८ जुनपासून केवळ तीन तास दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. ही दुकाने सुरु ठेवताना सोशल डिस्टन्स राखणे,सॅनिटायझरचा वापर,मास्क वापरणे आदी शासकीय नियमांचे पालन करणे बंधनकारक ठेवले आहे.

शनिवारी (दि १२) सकाळी ११ च्या दरम्यान बारामती एमआयडीसी चौकात हा केक कापण्यात आल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या छायाचित्रावरुन स्पष्ट दिसत आहे.रस्त्यावर केक कापणाऱ्या अनेकांची वरात पोलिसांनी पोलीस ठाण्यात नेली आहे. संबंधितांवर गुन्हे देखील दाखल केले आहेत.

मात्र, याच पोलिसांनी काही युवकांसह दुचाकीवर ठेवलेला केक कापत वाढदिवस साजरा केला आहे. शिवाय वाढदिवस साजरा करताना काही पोलिसांनी मास्क देखील वापरले नसल्याचे धक्कादायक चित्र आहे.तसेच सोशल डिस्टन्सचाही फज्जा उडविल्याचे या छायाचित्रावरून दिसुन येते. पोलीस सध्या कडक तपासणी करत आहेत.यामध्ये सर्वसामान्यांच्या वाहन परवान्यापासुन कसुन तपासणी करीत आहेत.यामध्ये कोणाचीही गय केली जात नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे.कोरोना रोखण्यासाठी ही कारवाई आवश्यकच आहे.या कारवाईला बारामतीकरांचा आक्षेप नाही.मात्र, सर्वसामान्यांना नियम लागु करणाऱ्या पोलिसांनी भर चौकात केक कापण्याचा नियमबाह्य प्रकार दुर्लक्ष करुन चालणार नाही.....भर चौकात केक कापत उपमुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला हरताळ फासलाशनिवारी (दि १२)  केक कापण्याचा प्रक़ार सुरु असताना उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत होते. पवार बारामतीत असतानाच पोलीसांचे भर चौकात हे सेलीब्रेशन सुरु होते.शासन व प्रशासनाच्या प्रयत्नांसह नागरीकांच्या सहकार्याने कोरोनाबाधितांची संख्या घटली आहे.तरीहि पुन्हा संसर्ग वाढु नये,यासाठी प्रत्येकाने खबरदारी घ्यावी.नियमांचे पालन काटेकोरपणे करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी आज पार पडलेल्या कोविड १९ विषाणु प्रादुर्भाव परीस्थिती आणि उपाययोजना बैठकीत केले. त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी भर चौकात केक कापत उपमुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला हरताळ फासला.—————————————————

टॅग्स :Baramatiबारामतीcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसAjit Pawarअजित पवार