पोलिसांनी दुचाकी चोरांचा लावला छडा, मुद्देमाल हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:19 IST2018-08-15T00:19:16+5:302018-08-15T00:19:26+5:30
गस्तीदरम्यान दुचाकीचोरांचा छडा लावण्यात बारामती पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी १ लाख रुपयांच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. पकडण्यात आलेल्या तिघांमध्ये दोन अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे.

पोलिसांनी दुचाकी चोरांचा लावला छडा, मुद्देमाल हस्तगत
बारामती - गस्तीदरम्यान दुचाकीचोरांचा छडा लावण्यात बारामती पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी १ लाख रुपयांच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. पकडण्यात आलेल्या तिघांमध्ये दोन अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी याबाबत माहिती दिली. प्रवीण पांडुरंग मोहिते (वय ४२, रा. कल्पनानगर, तांदुळवाडी, ता. बारामती) यांची पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी २५ मे २०१८ रोजी अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली होती.
८ आॅगस्ट रोजी पोलीस हवालदार डोईफोडे, जगताप हे रात्रीच्या वेळी गस्त करीत होते. त्या वेळी एमईएस हायस्कूलसमोर बिगर नंबरप्लेटची दुचाकी भरधाव वेगाने जाताना दिसून आली.
पोलिसांना याबाबत संशय आल्याने त्यांनी दुचाकीचा पाठलाग करून दुचाकी पकडली. अटक केलेल्या तरुणांसमवेत ३ अल्पवयीन तरुणही या घटनांमध्ये सहभागी असल्याचे पोलिसांनी सांगितले. जप्त केलेल्या दुचाकी बारामती शहर, बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरून नेल्याचे आरोपींनी कबूल केले.
तसेच दुसऱ्या एका कारवाईत अजित हरिभाऊ पोतकुले (वय २५, रा. तपोवन कॉलनी, बारामती) यांची बुलेट आरोपी भगवान महादेव कांबळे (वय २५, रा. वांगी नं. १, करमाळा) हा चोरून घेऊन जाताना त्याला रंगेहाथ पकडले. पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक समाधान चवरे, सहायक फौजदार डी. एन. सोनवणे यांनी कारवाई केली.