शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बिगारी कामगार ते हॉटेल व्यावसायिक; चोरट्याचा खरा चेहरा अखेर जगासमोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 23:59 IST

ऐशोआरामात जगण्यासाठी करायचा सोनसाखळी चोरी

पुणे : पुण्यात सोनसाखळी आणि बॅग लिफ्टिंग करुन पोलिसांना घाम फोडणारा राजू राठोड ऊर्फ राजाभाऊ राठोडला पोलिसांनी अटक केली आहे. मूळचा बिगारी कामगार असलेल्या राजूने नंतर लातूर आणि पुणे परिसरात इलेक्ट्रिशन, वायरमन म्हणून काम केले. त्यानंतर त्याने एमएसईबीकडून लाईट मीटर व वायरिंगचे कामही केले. लातूर येथे रियल इस्टेट एजंट म्हणून प्लॉटिंगचा व्यवसायही केला. पण ऐशोआरामाचे जीवन जगण्यासाठी त्यातून त्याला तितका फायदा मिळत नव्हता. त्यामुळे त्याने सोनसाखळी चोरीचा मार्ग निवडला.लातूरमध्ये त्याने सोनसाखळी व बॅग चोरीचे बरेच गुन्हे केले. त्यातील पैशातून त्याने लातूरमध्ये मोठा बंगला खरेदी केला व समाजात प्रतिष्ठित म्हणून वावरु लागला. चोरीच्या पैशातून त्याने राजकीय लोकांशी सलगी वाढवून लातूर जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढविण्याचा देखील प्रयत्न केला. त्यासाठी अर्जही दाखल केला होता. पण त्याला माघार घ्यायला सांगण्यात आले. त्याच दरम्यान पोलिसांनी सोनसाखळी चोरी करताना त्याला रंगे हाथ पकडले व त्याचा खरा चेहरा समोर आला. त्यांच्याकडून अनेक गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोने व पैसे जप्त करण्यात आले. राजूला काही वर्षांपूर्वी लातूरमधील तुरुंगात ठेवण्यात आले. तेथे त्याची शिवा बिरादार याच्याशी ओळख झाली. लातूरमध्ये आता आपण बदनाम झालो हे लक्षात आल्यावर  राठोड तुरुंगातून सुटल्यावर शिवाला घेऊन मे महिन्यात पुण्यात आला. सुरुवातीला पुणे शहरातून एक मोटारसायकल चोरुन त्यावरुन चालत्या रिक्षातून बॅग चोरी व सोनसाखळी चोरीचे गुन्हे करु लागला. चोरीची मोटारसायकल घेऊन तो चोरी करीत असे. कालांतराने तो मोटारसायकल सोडून देत असे. सोनसाखळी व बॅग चोरीतून मिळालेल्या पैशातून त्याने वडगाव भागात जुना मुंढवा रोडवर हॉटेल नंदिनी नावाने हॉटेल व्यवसाय सुरु केला. हॉटेल व्यवसाय चांगला चालू लागल्यावर चोरीचे प्रकार सोडून देण्याचा त्याचा विचार होता. पण, त्याअगोदरच पोलिसांनी त्याचा खरा चेहरा समोर आणला. युट्युबवरुन सुचली हॉटेलची कल्पनाराठोडला युट्युबवरुन हॉटेल सुरु करण्याची कल्पना सुचली. त्याने दोघांसाठी १२०० रुपयांची थाळी अशी योजना सुरु केली होती. जर दोघांनी ही थाळी संपविली तर ५००० रुपये कॅश बॅक देण्याची योजना सुरु केली होती. त्याचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. या हॉटेलसाठी त्याने जाहिरात देऊन आलेल्या लोकांच्या मुलाखतीही घेतल्या होत्या. मुख्य आचाऱ्याला २५ हजार रुपये व वेटरला ९ हजार रुपये पगार देऊन त्यांच्या राहण्याचीही व्यवस्था त्याच ठिकाणी केली होती.  

टॅग्स :ThiefचोरPuneपुणे