शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मास्क लावून सोनसाखळी चोरणारे अट्टल गुन्हेगार अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 20:32 IST

मास्क लावून साेनसाखळी चाेरणाऱ्यांना पाेलिसांनी सापळा रचून अटक केली आहे.

पुणे : तोंडाला मास्क, हात रुमाल लावून सकाळी सकाळी फिरायला बाहेर पडणार्‍या महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेणार्‍या दोघांना खडकी पोलिसांनी अटक केली आहे. भारत ऊर्फ सोनू मनोहर चावरे (वय २८, रा. आदर्शनगर, देहुरोड, मुळ रा. पिंपळगाव, निफाड, नाशिक) आणि एसबीर नरेश चौहान (वय २८, रा. देहुरोड, मुळे कर्जत, जि.  रायगड) अशी त्यांची नावे आहेत़ त्यांच्याकडून खडकी, भोसरी, पिंपरी असे ३ गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून चोरीला गेलेले दागिने व दुचाकी असा २ लाख २३ हजार २०० रुपयांचा माल जप्त केला आहे.

उषा जवाजिवार (वय ७०, रा. जुना खडकी बाजार) या १८ मार्च रोजी सकाळी मैत्रिणीसह दुध व भाजीपाला आणण्यासाठी चौपाटीकडे जात होत्या. यावेळी सकाळी पावणे आठ वाजता मोटारसायकलवरुन आलेल्या दोघंंनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेली होती. या गुन्ह्याचा तपास करीत असताना गुन्हा घडला, त्या ठिकाणापासून काही अंतरावरील सीसीटीव्हीमध्ये हे दोघे संशयित कैद झाले होते. त्या आधारे पोलीस नाईक किरण घुटे, काँस्टेबल संदीप गायकवाड, अनिरुद्ध सोनवणे, गणेश चिमटे यांनी मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी होळकर पुलावर त्यांना सापळा रचून पकडले. तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक प्रताप गिरी, सहायक पोलिस फौजदार तापकीर, ठोकळ, पोलिस कर्मचारी सावंत, पवार, लोखंडे, घुटे, कराळे, गायकवाड, सोनवणे, चेमटे यांनी ही कारवाई  केली.

हे दोघे जण देहुरोड परिसरातील राहणारे आहेत. ते तेथून पहाटे ५ वाजताचे निघत. मोटारसायकलवरुन रोडला आल्यावर नंबर प्लेट उलटी लावायची व ज्या ठिकाणी चैन स्रैचिंग करायची आहे, त्या ठिकाणी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पोहोचून ते तेथील रेकी करीत व चोरी करत त्यानंतर ते दुसर्‍या दिशेने व लहान लहान रस्त्याने पळून जात असत.

भारत चावरे हा श्रीरामपूर येथील २०१५ च्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपी आहे़ त्यांच्याविरुद्ध शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्यांच्यासह साथीदारांवर संघटीत गुन्हेगारी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या गुन्ह्यात तो फरार होता. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेPoliceपोलिस