शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अदखलपात्र गुन्ह्यासाठी लाच घेताना पोलीस हवालदार जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 15:53 IST

अदखलपात्र गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच घेताना पुणे ग्रामीण पोलीस दलातल्या पौड पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक सापळा रचून रंगेहाथ पकडले. 

पुणे : अदखलपात्र गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच घेताना पुणे ग्रामीण पोलीस दलातल्या पौड पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक सापळा रचून बुधवारी सकाळी रंगेहाथ पकडले. पोलीस हवालदार तात्यासाहेब रामचंद्र आगवणे (वय ४८, रा. स्वारगेट पोलीस वसाहत) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी, तक्रारदार यांच्याविरूद्ध पौड पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल आहे. त्यावर कारवाई न करण्यासाठी आगवणे याने तक्रारदार यांच्याकडे ५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली. त्यानंतर याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती़ त्या तक्रारीची ८ सप्टेंबर रोजी पडताळणी करण्यात आली. त्यात तडजोड करुन ३ हजार रुपये लाच घेण्याचे मान्य केले़ त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सकाळी सापळा रचला़. पौड पोलीस ठाण्याच्या समोरील विश्रामगृहात ३ हजार रुपयांची लाच घेताना आगवणे याला रंगेहाथ पकडण्यात आले.ही कारवाई पुणे विभागाचे पोलिस अधिक्षक संदीप दिवाण, अप्पर पोलीस अधिक्षक राजकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय पतंगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकCorruptionभ्रष्टाचार