खंडणीप्रकरणी ‘त्या’ पोलीस मित्राला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 10:38 PM2020-02-15T22:38:17+5:302020-02-15T22:55:06+5:30

अ‍ॅट्रोसिटीची भीती दाखवून डॉक्टरांकडून ७५ लाख रुपयांची खंडणीप्रकरण

'Police' arrested in the case of extortion | खंडणीप्रकरणी ‘त्या’ पोलीस मित्राला अटक

खंडणीप्रकरणी ‘त्या’ पोलीस मित्राला अटक

Next
ठळक मुद्देफिर्यादीनुसार पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करुन जयेश कासट यांना अटक

पुणे : अ‍ॅट्रोसिटीची भीती दाखवून डॉक्टरांकडून ७५ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्याला धमकावून त्याच्याकडून पैसे उकळणाऱ्या पोलीस मित्राला अखेर पोलिसांनीअटक केली. जयेश कासट (रा़ नारायण पेठ)  असे त्याचे नाव आहे.याप्रकरणी मनोज अडसुळ यांचा भाऊ डॉ. हेमंत तुकाराम अडसुळ (वय ५५, रा. चिंतामणीनगर, सहकारनगर) यांनी फिर्याद दिली आहे. 
याबाबत पोलिसांनी सांगितले की, डॉ़ हेमंत अडसुळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांना जयेश कासट यांनी २ जानेवारी रोजी दुपारी फोन करुन नारायण पेठेतील निरंजन मेडिकल या ठिकाणी बोलावले़ तेथे जर आला नाही तर तुझा भाऊ मनोज प्रचंड अडचणीत येईल. सायंकाळी ते दुकानात गेल्यावर त्याने मी पुणे पोलिसांच्या विघ्नहर्ता न्यास या ट्रस्टचा मेंबर आहे व अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी व पत्रकार माझ्या ओळखीचे आहेत. त्यानंतर ६ जानेवारीला त्याने पुन्हा धमकी दिली. तेव्हा आम्ही ५लाख रुपये रोख दिले़ तरीही त्याने डॉ़ रासने यांनी दिलेल्या ७० लाख रुपयांची मागणी करुन त्रास देण्यास सुरुवात केली.
पोलीस मित्र म्हणून वावरणारे जयेश कासट हे आपल्याकडे खंडणी मागत असल्याची तक्रार मनोज अडसुळ यांनी पोलीस आयुक्तांकडे ६ फेब्रुवारी रोजी केली होती.
 या तक्रार अर्जाची चौकशी करीत असताना डॉ़ दीपक रासने यांनी मनोज अडसुळ यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती. त्या अर्जाची चौकशी करण्यात आली. त्यावरुन मनोज अडसुळ यांच्यावर ७५ लाख रुपयांची खंडणी घेतल्याचा गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून मनोज अडसुळ फरारी आहे. त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यानंतर शनिवारी डॉ. हेमंत अडसुळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करुन जयेश कासट यांना अटक केली आहे. उशीरा का होईना अडसुळ कुटुंबियांना न्याय मिळाला, असे त्यांचे वकील विजय ठोंबरे यांनी सांगितले. 


 

Web Title: 'Police' arrested in the case of extortion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.