शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटी योजनेतील सायकल चोरणाऱ्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 20:33 IST

स्मार्ट सिटी योजनेतील एक सायकल चोरीची फिर्याद मिळाल्यानंतर कोंढवा पोलिसांनी ते गांभीर्याने घेऊन सायकलचोरला पकडले. त्याच्याकडून सायकलही जप्त केली आहे.

पुणे : पुणे शहरातून दररोज साधारण ८ ते १० वाहने चोरीला जातात़ त्यामध्ये दुचाकींबरोबरच चारचाकींचाही समावेश असतो़. वाहन चोरी रोखण्यामध्ये पोलिसांना यश येत नसले तरी त्याबाबत पोलीस फारसे गंभीर नसतात. पण, स्मार्ट सिटी योजनेतील एक सायकल चोरीची फिर्याद मिळाल्यानंतर कोंढवा पोलिसांनी ते गांभीर्याने घेऊन सायकलचोरला पकडले. त्याच्याकडून सायकलही जप्त केली आहे. 

    महादेव विजयकुमार मुनळे (वय १९, रा. कृष्णानगर, महम्मदवाडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत सायकल पुरवठा  करणाऱ्या कंपनीचे व्यवस्थापक आदर्श केदारी यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात २५०० सायकली उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या सायकलींना जीपीएस यंत्रणा लावण्यात आली आहे. सायकल वापरणाऱ्यांकडून प्रतिमहा ९९ रुपये भाडे आकारण्यात येते. शहरातील मध्यभागातून एक सायकल चोरीला गेली होती. याबाबतची तक्रार कोंढवा पोलिसांकडे आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. जीपीएस यंत्रणा तसेच कंपनीकडे नोंद असलेल्या मोबाईल क्रमांकावरुन मुनळे याचा पोलिसांकडून माग काढण्यात आला. मुनळेला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक सायकल जप्त करण्यात आली आहेत. 

    पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहाय्यक आयुक्त मिलींद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, उपनिरीक्षक संतोष शिंदे, हवालदार राजस शेख, शिंदे, अमित साळुंके, पृथ्वीराज पांडुळे, योगेश कुंभार, अजीम शेख आदींनी ही कारवाई केली. दरम्यान, पोलिसांनी कोंढवा भागात झालेल्या घरफोडीच्या गुन्हयातील आरोपी रिजवान नईम मेमन (वय १९, रा. सुंदर विहार सोसायटी, मिठानगर, कोंढवा खुर्द) याला ताब्यात घेतले. अटकेत असलेल्या मेमनने घरफोडीचे दोन गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून ५९ हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटकPune Cycle Schemeपुणे सायकल योजना