शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

रिक्षावरच्या 313 क्रमांकावरुन पाेलिसांनी लावला आराेपींचा शाेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 20:26 IST

रिक्षाने येऊन घरफाेडी करणाऱ्या आराेपींना पाेलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 10 लाख 64 हजार 750 रुपयांच्या घरफाेडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

पुणे : रिक्षाने येऊन घरफाेडी करणाऱ्या आराेपींना पाेलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 10 लाख 64 हजार 750 रुपयांच्या घरफाेडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. यातील 4 लाख 68 हजार 250 रुपयांचे साेन्याचे व चांदीचे दागिने पाेलिसांनी हस्तगत केले आहे. आराेपी गुन्ह्यासाठी वापरत असलेल्या रिक्षाच्या पुढील बाजूस हिरव्या रंगात लिहीलेल्या 313 या क्रमांकावरुन पाेलिसांनी आराेपींना शाेधून काढत अटक केली आहे. त्याचबराेबर या आराेपींकडे चाैकशी करुन विमानाने प्रवास करुन पुण्यात येऊन चाेरी करणाऱ्या टाेळीलाही जेरबंद करण्यात पाेलिसांना यश आले आहे. 

नरेश पुरुषाेत्तमलाल मल्हाेत्रा (वय 61, रा. कुबेरा पार्क साेसायटी, काेंढवा खु.) आणि शक्ती शिवाजी ननवरे (वय 35 रा, महंमदवाडी) यांनी 15 जानेवारी राेजी हडपसर पाेलीस स्टेशनमध्ये घरफाेडी झाल्याची तक्रार नाेंदवली हाेती. याच दिवशी वाकड आणि निगडी पाेलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घरफाेडीचे गुन्हे दाखल झाले हाेते. या गुन्ह्यांचा तपास करताना पाेलिसांना आराेपी ताेंडाला रुमाल बांधून घरफाेडी करत असल्याची माहिती मिळाली हाेती. आराेपी एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी कुठल्या वाहनातून जातात याचा तपास करण्यासाठी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासले असता आराेपी रिक्षातून जात असल्याचे समाेर आले हाेते. रिक्षाचा क्रमांक स्पष्ट दिसत नसला तरी रिक्षाच्या समाेरील बाजूस हिरव्या रंगात लिहीण्यात आलेला 313 क्रमांक व्यवस्थित दिसत हाेता. या क्रमांकावरुन पाेलिसांनी शाेध घेतला असता ही रिक्षा वाहीद खुर्शिद मन्सुरी (वय 33, रा. निगडी मुळ रा. उत्तरप्रदेश) चालवत असल्याचे समाेर आले. त्याला ताब्यात घेऊन तपास केला असता, आराेपीने त्याच्या तीन साथिदारांसाेबत घरफाेडी केल्याचे कबुल केले. पाेलिसांनी ताब्यात घेतलेल्या आराेपीच्या मदतीने निगडी येथे राहण्यास असलेला त्याचा साथिदार रियासत रियाजुद्दीन मन्सुरी (वय 28) याला अटक केली. त्याच्या मदतीने अजमेर राजस्थान येथे राहणारा त्याचा साथिदार रिजवान निजामुद्दीन शेख (वय 25 रा. राजस्थान) याला राजस्थान येथून ताब्यात घेण्यात आले. 

तसेच या दाेन्ही आराेपींच्या मदतीने चाैथा आराेपी फैसल जुल्फीकार अन्सारी (वय 22) याला बिजनाेर उत्तरप्रदेश येथून अटक करण्यात आली. आराेपींनी एकूण चार घरफाेडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. या सर्व आराेपींच्या मदतीने विमानाने पुण्यात येऊन चाेरी करणाऱ्या माेहम्मद सलमान झुल्फकार अन्सारी उर्फ सलमान अन्सारी (वय 27), नफासत वहीद अन्सारी (वय 29, सर्व रा, उत्तरप्रदेश) यांना त्यांचा पुण्यातील साथीदार रिक्षाचालक मुशरफ यामीन कुरेशी (वय 35 रा. निगडी) याच्या मदतीने पुणे विमानतळ येथे अटक करण्यात आली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेPoliceपोलिस