नीरेत बेशिस्त पार्किंगवर पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:14 IST2021-08-28T04:14:37+5:302021-08-28T04:14:37+5:30
शहरामध्ये परिसरातील अनेक नागरिकांचा राबता असतो. त्यामुळे शहरातील बाजारपेठेत दिवसभर मोठी गर्दी होत असते. त्यातच नागरिकांनी रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने ...

नीरेत बेशिस्त पार्किंगवर पोलिसांची कारवाई
शहरामध्ये परिसरातील अनेक नागरिकांचा राबता असतो. त्यामुळे शहरातील बाजारपेठेत दिवसभर मोठी गर्दी होत असते. त्यातच नागरिकांनी रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने उभी केल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. रुंद असणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी डबल पार्किंग तेही चुकीच्या पद्धतीने पार्किंग केलेली वाहने रहदारीस अडथळा निर्माण करत आहेत. मुख्य बाजारपेठेत यामुळे मोठी वाहतूक कोंडी होते. याबाबत नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रार केली होती. यानंतर पोलिसांनी अशा वाहनांवर कारवाईला सुरुवात केली आहे.
बुधवारपासून धडक कारवाईला सुरुवात झाली असून, पहिल्या दिवशी सात तर, गुरुवारी आठ व शुक्रवारी सहा वाहनांवर कारवाई केली. ही कारवाई ऑनलाईन होत असल्याने वाहन रस्त्यावरच उभे करून इतरत्र जाऊन बसणाऱ्या वाहनचालकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. वाहन मालकाला याची माहिती एस.एम.एस द्वारे गेल्यानंतर त्यांची तारांबळ उडते आहे.
या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक कैलास गोतपागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुरेश गायकवाड, पोलीस नाईक राजेंद्र भापकार, पोलीस नाईक हरिश्चंद्र करे, नीलेश जाधव, पोलीस मित्र रामभाऊ कर्णवर यांचा सहभाग होता.
२७ नीरा
नीरा बाजारपेठेत बेशिस्तपणे वाहन पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करताना पोलीस.