शहरं
Join us  
Trending Stories
1
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
2
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
3
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
4
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
5
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
6
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
7
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
8
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
9
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
10
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
11
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
12
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
13
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
14
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
15
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
16
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
17
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!
18
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर...! महायुती की स्वबळावर, निवडणुकीबाबत मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
19
फायदेच फायदे! साखर नसलेला चहा आरोग्यासाठी गुणकारी, वजन कमी करण्यासाठी प्रभावी
20
ठरलं! 'या' तारखेला टीम इंडियाला मिळणार Asia Cup ट्रॉफी; पण नक्वी यांनी पुन्हा ठेवली खास अट

अवैधरित्या चंदनाची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई; २५ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 15:09 IST

एका टेम्पोतून चंदनाच्या झाडाची लाकडे अवैधरित्या चालवली आहेत अशी पोलिसांना माहिती मिळाली होती.

 शिक्रापूर : पुणे- नगर रोडवरील चाकण फाटा येथे पाठलाग करून पकडलेल्या टेम्पोतून चंदनाची छुपी तस्करी सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पंचवीस लाख ८३ हजार रुपयांच्या मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेने एकाला अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी पहाटे करण्यात आली.  सूरज कैलास उबाळे (वय २४ रा.चांदा तालुका नेवासा, जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना पुणे-नगर रस्त्यावर एका टेम्पो (एमएच-१७. बीडी. २६९८) मध्ये चंदनाच्या झाडाची लाकडे अवैधरित्या चालवली आहेत अशी खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकांना सूचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या वाहनाने टेम्पोचा पाठलाग करत शिक्रापुर येथे चाकण चौकात आले असता त्याला थांबवले. त्यानंतर पोलिसांनी चालकाची कसून चौकशी केल्यानंतर त्याने प्रथम गाड़ी रिकामी असल्याचे सांगितले. मात्र पथकाने गाडीची पूर्ण झड़तीघेतल्यानंतर गोण्यांमध्ये १९०किलोग्राम वजनाची चंदनाच्या गाभ्याची लाकडे मिळून आली. आरोपी सूरज कैलास उबाळे (वय २४रा.चांदा तालुका नेवासा जिल्हा अहमद नगर) याला अटक केली.सदरची कार्यवाही पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, अमोल गोरे,दत्तात्रय गिरमकर,मंगेश थिगळे,अक्षय नवले,प्रसन्नजीत घाडगे यांनी केली आहे.पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहेत . 

टॅग्स :Shikrapurशिक्रापूरPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारी