पोखरी घाट पर्यटकांनी फुलला

By Admin | Updated: August 19, 2014 23:11 IST2014-08-19T23:11:37+5:302014-08-19T23:11:37+5:30

स्वातंत्र्यदिनाबरोबरच जोडून आलेल्या रविवार व पतेती या सुटय़ांमुळे श्रीक्षेत्र भीमाशंकरकडे जाणा:या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली.

Pokhri Ghat blossomed by tourists | पोखरी घाट पर्यटकांनी फुलला

पोखरी घाट पर्यटकांनी फुलला

डिंभे : स्वातंत्र्यदिनाबरोबरच जोडून आलेल्या रविवार व पतेती या सुटय़ांमुळे श्रीक्षेत्र भीमाशंकरकडे जाणा:या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली. यामुळे पोखरी घाट गर्दीने खुलून गेला होता. माळीण दुर्घटनेनंतर पहिल्यांदाच पर्यटकांनी येथे मनसोक्त वर्षाविहाराचा आनंद लुटला. 
श्रवण महिना सुरू होताच श्रीक्षेत्र भीमाशंकरकडे जाणा:या पर्यटकांच्या व भाविकांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ होत असते. जवळपास दोन ते अडीच लाख भाविक येथील पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतात. श्रवण महिन्यात लाखो पर्यटक-भाविक येथे हजेरी लावतात. 
या परिसरात असणारे डिंभे धरण, डिंभे गावच्यापुढे पोखरी घाटाची सुरू होणारी वेडीवाकडी वळणो, या घाटातील धबधबे व घाटातून खाली दिसणारा गोहे पाझर तलाव, परिसरातील भातशेतीबरोबरच येथील आदिवासी लोकवस्तीची येणा:या पर्यटकांना भुरळ घातल्याशिवाय राहत नाही. तळेघरच्या पुढील निसर्गसौंदर्य, कोंढवळ धबधबा यासारख्या अनेक निसर्गाची रूपे या भागात पाहावयास मिळतात.
 पहिल्या श्रवणी सोमवारी या ठिकाणी दोन लाखांच्या वर भाविकांनी भीमाशंकरचे दर्शन घेतले होते; परंतु 3क् जुलैला घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे भीमाशंकरकडे जाणा:या पर्यटकांनीही पाठ फिरवली होती. दुस:या आणि तिस:या सोमवारी येथील गर्दीत घट झाली होती. 
चौथ्या सोमवाराला जोडून आलेली स्वातंत्र्यदिनाची व पतेतीची सुट्टी यामुळे भीमाशंकरकडे जाणा:या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली.  शुक्रवारपासूनच या रस्त्यावर गर्दी वाढू लागली होती. (वार्ताहर)

 

Web Title: Pokhri Ghat blossomed by tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.