भिमाशंकरचे दर्शन करुन परतत असताना पोखरी घाटात अपघात; ४५ जखमी, पाच गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 17:34 IST2017-12-19T16:17:09+5:302017-12-19T17:34:37+5:30
भिमाशंकरचे दर्शन करुन परतत असताना पोखरी घाटामध्ये अलिबाग येथील खासगी बसला अपघात झाला. या अपघातात सुमारे ४५ भाविक जखमी झाले आहेत.

भिमाशंकरचे दर्शन करुन परतत असताना पोखरी घाटात अपघात; ४५ जखमी, पाच गंभीर
ठळक मुद्देपोखरी घाटामध्ये अलिबाग येथील खासगी बसला अपघातपाच भाविक गंभीर असून त्यांना पुणे येथे हलविण्यात आले उपचारासाठी
घोडेगाव : भिमाशंकरचे दर्शन करुन परतत असताना पोखरी घाटामध्ये अलिबाग येथील खासगी बसला अपघात झाला. या अपघातात सुमारे ४५ भाविक जखमी झाले आहेत. त्यातील पाच भाविक गंभीर असून त्यांना उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे. उरर्वरित जखमींवर घोडेगाव रुग्णालयात उपचार सुरु आहेत.