पोदार स्कूलचे ऑनलाइनचे स्नेहसंमेलन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:10 IST2021-04-11T04:10:25+5:302021-04-11T04:10:25+5:30
विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी नाती जपणारे प्रेम कार्यक्रमाचे आयोजन केले होते. उद्घाटन प्राचार्य विशाल जाधव यांच्या हस्ते झाले. ...

पोदार स्कूलचे ऑनलाइनचे स्नेहसंमेलन उत्साहात
विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी नाती जपणारे प्रेम कार्यक्रमाचे आयोजन केले होते. उद्घाटन प्राचार्य विशाल जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी वर्षभरात पार पडलेल्या स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवले. विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. तसेच पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी नात्यांची महती, परिभाषा व नात्यातील गोडवा, जिव्हाळा दर्शवणारी गीते तसेच या गीतांवर नेत्रदीपक नृत्याविष्कार सादर केले.
यावेळी प्राचार्य विशाल जाधव म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्याचे काम नेहमीच संस्थेकडून होत असते. त्यासाठी संस्था अनेक स्पर्धा आयोजित करत असते. सध्याच्या परिस्थितीतसुध्दा आपण आपली नाती आत्मीयतेने जपली पाहिजे असे मतही त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, डी. एस. जे. फ्रँकलिन यांनी ऑनलाइन विद्यार्थ्यांच्या नेत्रदीपक नृत्याविष्काराचे कौतुक करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.
सूत्रसंचालन शीतल वानिया व सायली राजपूत यांनी केले. आभार आरती देशपांडे यांनी मानले.
१० दौंड
वार्षिक स्नेहसंमेलनाचे दीपप्रज्ज्वलाने उद्घाटन करताना विशाल जाधव.