शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

चांदणी चौकात 'पीएमटी'ची बस जळून खाक, चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवासी सुखरूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 23:36 IST

अग्नीशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यात यश.

मार्केट यार्ड ते मारणेवाडी ही साडेआठ वाजता सुटणारी बस नेहमीप्रमाणे ४० प्रवाशांना घेऊन पिरंगुटच्या दिशेने जात होती. त्यावेळी चांदणी चौकात बावधन गावाच्या हादीत बसच्या इंजिनमध्ये आग लागल्याचे चालक विक्रम सिंह गरूड यांच्या लक्षात आले. प्रसंगावधान राखून त्यांनी बस बाजूला घेत कंडक्टर अभिजीत साबळे यांना प्रवाशांना तात्काळ खाली उतरवण्यास सांगितले. बस मध्ये साधारण 35 ते 40 प्रवाशांसह दोन पत्रकारदेखील होते. त्यातील एक पत्रकार प्रतिक्षा ननावरे यांनी या घटनेची माहिती मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीला दिली.  तहसीलदार अभय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद बलकवडे सह त्यांची टीम घटनास्थळी काही वेळातच पोहोचली. या वेळी कोथरूड अग्निशामक दल आणि वारजे अग्निशामक दलही घटनास्थळी दाखल झाले होते. मोठ्या प्रयत्नांनंतर अग्नीशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. यावेळी बावधन पोलीस चौकीचे पी एस आय साळूंके, हवलदार विजय गायकवाड, व्हायाळ, सुनील जाधव, तसेच जवळच असणारे ट्राफिक पोलीस यांनी घटनास्थळाजवळ जमलेल्या आणि प्रवाशांना लांब ठेवण्याचे विशेष प्रयत्न केले.

कोथरूड फायर स्टेशन आणि वारजे फायर स्टेशन सचिन मांडवकर, गजानन पाथरूडकर, यांच्यासह बाबूराव शितकल, अमोल पवार, दीपक पाटील, महेश शिळीमकर, सागर सोनवने, राजेंद्र पायगुडे, जयश लबडे, निलेश तागुंदे, रुपेश जांभळे, अतुल ढगळे, यांच्या अथक प्रयत्नामुळे मोठा अनर्थ टळला, सर्व प्रवाशी सुखरूप असून पी एमटी बस मात्र यात जळून खाक झाली आहे.

टॅग्स :Puneपुणे