पीएमपीच्या धडकेत महिलेचा मृत्यू

By Admin | Updated: August 17, 2015 02:26 IST2015-08-17T02:26:35+5:302015-08-17T02:26:35+5:30

घोरपडी व्हिलेजसमोर पीएमपीएमएल व मोटारसायकल अपघातात एका महिलेचा मृत्यू तर तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी घडली

PM's death: Death of woman | पीएमपीच्या धडकेत महिलेचा मृत्यू

पीएमपीच्या धडकेत महिलेचा मृत्यू

मुंढवा : घोरपडी व्हिलेजसमोर पीएमपीएमएल व मोटारसायकल अपघातात एका महिलेचा मृत्यू तर तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी घडली.हडपसरकडून स्टेशनकडे जाणारी पीएमपी (हडपसर-सांगवी, एमएच १२ एचबी १४३७) बसने स्टेशनकडून येणाऱ्या मोटारसायकलला (एमएच १२ एलसी ३९८४) जोरात धडक दिली. यात महिलेच्या डोक्याला जबर मार लागल्याने भाग्यमा तिरुपाल (वय ३८, रा. श्रीनाथनगर) यांचा मृत्यू झाला, तर पती मेका तिरुपाल (वय ४२) गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात प्रकरणी बस ड्रायव्हर प्रकाश गायकवाड (वय ५५, रा. भेकराईनगर) यास मुंढवा पोलिसांनी अटक केली आहे. या अपघातासह आठवड्यात तीन अपघाताची नोंद झाली.
या रस्त्यावर पुणे कँटोन्मेन्टच्या दोन व खाजगी शाळा असून, दोन्ही ठिकाणी रिक्षा स्टँड व बसचा थांबा शाळेसमोर हलवला आहे. त्यामुळे खासगी प्रवासी रिक्षा रस्त्यावर उभ्या असतात. पूर्वीचा बसथांबा रिक्षा व्यावसायिकांकरिता शाळेकडे हलविल्याने या ठिकाणी सतत अपघात होत आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. हा अपघात घडताच नागरिकांनी बसवर दगडफेक केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
(वार्ताहर)

Web Title: PM's death: Death of woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.