शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पीएमआरडीएने दंडाची २५ टक्के रक्कम केली कमी ; नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 18:54 IST

पुणे प्रादेशिक विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) वतीने अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी दंडाची रक्कम कमी केली आहे.

ठळक मुद्देअनधिकृत बांधकामे : नियमित करण्यासाठी पाच टक्केच दंड भरावा लागणार

पुणे : पुणे प्रादेशिक विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) वतीने अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी दंडाची रक्कम कमी केली आहे. प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील ८४२ गावांमधील नागरिकांना याचा मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या काही दिवसांत पीएमआरडीएच्या वतीने जनजागृती करण्यासाठी पाच गावांमध्ये कार्यशाळा घेण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त किरण गित्ते यांनी दिली. अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी किती दंड आकारावा, याचा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांनी घ्यावा, असा आदेश मध्यंतरी राज्य शासनाने काढला होता. त्यामुळे ही बांधकामे नियमित करण्याचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळाले. त्या आदेशाचा आधार घेऊन पीएमआरडीएने अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत कपात करून पाच टक्केच शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे.रेडीरेकनरमध्ये नमूद केलेल्या बांधकाम खर्चाच्या तीस टक्के रक्कम दंड म्हणून यापूर्वी ही बांधकामे नियमित करताना आकारली जात होती. त्यामध्ये पीएमआरडीएने कपात करून ती आता पाच टक्के घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी काही दिवसांपूर्वी मान्यता दिली होती. बांधकाम नियमितीकरणासाठी किती दंड आकारावा, हेदेखील राज्य सरकारने ठरवून दिले होते. राज्याच्या ग्रामविकास विभागाचा निर्णय आणि दंडाच्या रकमेत झालेली कपात यांची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी पहिल्या टप्प्यात पाच गावांत कार्यशाळा घेणर असल्याचे किरण गित्ते यांनी याप्रसंगी सांगितले.पीएमआरडीए प्राधिकरणाच्या हद्दीत जवळपास २५ हजारांच्या असापास अनधिकृत बांधकामे असल्याची माहिती आहे. पुणे शहराच्या लगतच्या उपनगरांमध्ये यापैकी बहुतांश बांधकामे ही मोठ्या प्रमाणावर झाली आहेत. पीएमआरडीएकडून आतापर्यंत २ हजार १०० बांधकामांना नोटिसा बजाविल्या आहेत. काही दिवसांपूर्वी ग्रामविकास विभागाने पाच हजार लोकसंख्येच्या वरील गावांच्या गावठाणाची हद्द पंधरा मीटरपर्यंत वाढवली. त्यामुळे बहुतांश बांधकामे निवासी झोनमध्ये आल्याने ती नियमित होऊ शकतात, असे निदर्शनास आल्याने पीएमआरडीएने दंडाची रक्कम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.  यापूर्वी दोन वेळा पीएमआरडीएकडून विहित नमुन्यात आवश्यक त्या कागदपत्रांसह बांधकामे नियमित करण्यासाठी नागरिकांना ही मुदत वाढविण्यात आली. आता ही मुदत २१ जानेवारी २०१९ पर्यंत वाढविली आहे. ..................पीएमआरडीएने अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी फायदा घ्यावा. ३० टक्कयावरून कमी करून आता केवळ ५ टक्के रक्कम अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी आकारली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. जनजागृतीसाठी आम्ही लवकरच काही गावांत कार्यशाळा आयोजित करणार आहे. तसेच याबाबत सविस्तर माहिती पीएमआरडीएच्या संकेतस्थळावर आणि औंध येथील कार्यालयात उपलब्ध आहे.- किरण गित्ते, आयुक्त, पीएमआरडीए

टॅग्स :PuneपुणेPMRDAपीएमआरडीएKiran Gitteकिरण गित्ते