शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पीएमआरडीएच्या मेट्रोचे काम आॅक्टोबरपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 03:47 IST

पीएमआरडीएच्या हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. टाटा-सिमेन्स या दोन कंपन्या पीपीपी तत्त्वावर पुढील तीन वर्षांत २३.३ किलोमीटरचे प्रकल्पाचे काम पूर्ण करणार आहेत.

पुणे : पीएमआरडीएच्या हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. टाटा-सिमेन्स या दोन कंपन्या पीपीपी तत्त्वावर पुढील तीन वर्षांत २३.३ किलोमीटरचे प्रकल्पाचे काम पूर्ण करणार आहेत. मेट्रो निविदा मान्यतेसाठी राज्य सरकार, तर ‘करारनाम्या’साठी केंद्र सरकारची तांत्रिक प्रक्रिया पुढील दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल. त्यामुळे आॅक्टोबर २०१८ पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी पत्रकार परिषदेत दिली.पीएमआरडीए मेट्रो प्रकल्पाच्या प्रगतीसंदर्भात माहिती देताना गिरीश बापट बोलत होते. या प्रसंगी पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विद्युत वरखेडकर उपस्थित होते.बापट म्हणाले, ‘‘पीएमआरडीएच्या मेट्रोचे मार्गावर एकूण २३ स्थानके उभारण्यात येणार आहेत. प्रकल्पाची एकूण खर्च ८ हजार ३१३ कोटी रुपये, त्यापैकी भूसंपादनासाठी १,८११ कोटी लागणार आहेत. या मेट्रोचे संपूर्ण काम उन्नत मार्गावर संकल्पित करण्यात आले असून, प्रत्यक्ष काम आॅक्टोबर २०१८पासून सुरू होईल. पुढील तीन वर्षांत वरील कंपनीने काम पूर्ण करायचे आहे. तसेच, पुढील ३० वर्षे संपूर्ण प्रकल्पाचा मेंटेनन्स सांभाळायचा आहे. प्रकल्पाची मालकी हक्क पीएमआरडीएकडे राहणार आहे. त्यामुळे या कंपन्या फक्त विकसक आणि देखभाल-दुरुस्तीचे काम करणार आहेत. दोन दिवसांपूर्वी राज्य शासनाने या प्रकल्पासाठी बालेवाडीतील साडेपाच हेक्टर जमीन पीएमआरडीएला देण्यास मंजुरी दिली आहे.’’पीएमआरडीएची २३.३ किलोमीटरची मेट्रो तसेच वनाझ ते निगडी आणि वनाझ ते रामवाडी या मार्गांवरील स्थानकाजवळ दुचाकी तसेच चारचाकी पार्किंगचा प्रश्न सोडवावा लागेल. ससून, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे रेल्वे स्टेशन, महापालिका भवन, बालगंधर्व रंगमंदिर आदी शहरातील महत्त्वाची ठिकाणे या मेट्रो मार्गाला जोडण्यात येणार आहे. त्यासाठीदेखील आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे बापट या वेळी म्हणाले.मेट्रो चालवण्यासाठी प्रतिवर्ष ४०० ते ४५० कोटींची आवश्यकता भासते. पीएमआरडीएची मेट्रो ही देशातील पीपीपी तत्त्वावर उभारण्यात येणारी पहिली मेट्रो आहे. त्यामुळे शासनाने २०१७मध्ये मेट्रो धोरण आखले आहे. त्यानुसार सर्व काम विकसकाने करायचे आहे. सरकारवर अथवा पीएमआरडीएवर कोणत्याही प्रकारचा बोजा किंवा कर्ज राहणार नाही. पीएमआरडीए प्राधिकरण, राज्य शासनाचा वित्त विभाग आणि केंद्र शासनाची मान्यता यासाठी लागणार आहे.- किरण गित्ते,आयुक्त, पीएमआरडीए

 

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रो