शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीचे कामकाज आता मराठीत; सर्व विभागप्रमुखांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 16:58 IST

राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाकडून काढलेल्या आदेशात सर्व प्रशासकीय कामकाजामध्ये मराठी भाषेचा वापर करण्याच्या सूचना

- अंबादास गवंडीपुणे :पुणे महानगर परिवहन महामंडळातील (पीएमपी) सर्व विभागांमधील प्रशासकीय कामकाजामध्ये यापुढे मराठी भाषेचा वापर करण्यात यावा, अशा सूचना पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आले आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाकडून काढलेल्या आदेशात सर्व प्रशासकीय कामकाजामध्ये मराठी भाषेचा वापर करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पीएमपी प्रशासनाकडून हे आदेश काढले आहे.पीएमपीमधील सर्व पत्रव्यवहार, कार्यालयातील कामकाज, सर्वसामान्यांपर्यंत जाणारे सर्व नमुने, पत्रके, परवाने, नोंद वह्या, प्रमाण नमुने, प्रपत्रे, विभागीय नियम पुस्तिका, सर्व प्रकारच्या टिपण्या, शेरे, अभिप्राय, आदेश, अधिसूचना, प्रारूप नियम, कार्यालय परिपत्रके, करारनामे, अहवाल, बैठकांची इतिवृत्त, इत्यादी मराठी भाषेमध्ये करणे आवश्यक आहे.कार्यालयातील नामफलकावर एखादी व्यक्ती, अधिकारी, कर्मचारी यांचे नाव मराठी भाषेमध्ये असणे आवश्यक आहे. विशेषतः ही नावे मराठी भाषेत लिहिताना इंग्रजी अद्याक्षरांचे भाषांतर न करता मराठीतूनच लिहावे. तसेच कार्यालयातील निविदा, ठेकेदारांशी केलेले करार/वेगवेगळ्या कंपन्या, आस्थापनांशी केलेले करार राजभाषा अधिनियम १९६४ नुसार हे सर्व मराठी भाषेतून करावे, असे या आदेशामध्ये म्हटले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBus Driverबसचालकmarathiमराठीpassengerप्रवासी