शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

‘पीएमपी’ची भाडे वाढ होऊ देणार नाही  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 21:13 IST

मागील काही महिन्यांपासून डिझेल व सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ झाली आहे. त्यामुळे पीएमपीचा इंधनावरील दैनंदिन खर्च सुमारे ५० लाखांच्या पुढे गेला आहे.

ठळक मुद्दे इंधन दरवाढीमुळे रोजच्या खर्चात सुमारे चार लाखांची भर

पुणे : इंधन दरवाढीमुळे तोटा वाढत चालल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) प्रशासनाकडून भाडेवाढीवर गांभीर्याने विचार केला जात आहे. मात्र, प्रशासनाकडून भाडेवाढीचा प्रस्ताव आल्यास त्याला विरोध केला जाईल. पुणेकरांना चांगल्या दर्जाची बससेवा देण्याचा प्रयत्न आहे. भाडेवाढीचा विचार नसल्याचे महापौर मुक्ता टिळक आणि पीएमपीचे संचालक व नगरसेवक सिध्दार्थ शिरोळे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ‘पीएमपी’ प्रशासनापुढे पेच निर्माण होणार आहे.मागील काही महिन्यांपासून डिझेल व सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ झाली आहे. त्यामुळे पीएमपीचा इंधनावरील दैनंदिन खर्च सुमारे ५० लाखांच्या पुढे गेला आहे. इंधन दरवाढीमुळे रोजच्या खर्चात सुमारे चार लाखांची भर पडली आहे. दर पंधरा दिवसांनी हा खर्च वाढतच चालला आहे. प्रशासकीय खर्चही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यातच मार्गावर अपेक्षित बस येत नसल्याने तिकीट उत्पन्नावरही परिणाम होत आहे. त्यामुळे खर्च व उत्पन्नाचा मेळ बसविताना नाकीनऊ येत आहे. परिणामी, प्रशासनाकडून तिकीट भाडेवाढीवर गांभीर्याने विचार सुरू असल्याचे ‘पीएमपी’ अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात बोलताना शिरोळे म्हणाले, भाडेवाढीचा प्रस्ताव आल्यास त्याला विरोध केला जाईल. पुणेकरांना परवडणारी वाहतुक सेवा मिळायला हवी. पीएमपीचा ५१ टक्के खर्च वेतनावर तर २५ टक्के खर्च बस भाड्यावर होत आहे. इंधनापेक्षा हा खर्च खुप मोठा आहे. त्यामुळे इंधन दरवाढीचा फारसा परिणाम होत नाही. पण त्यामुळे तोट्यात वाढ होणार असली तरी हा तोटा महापालिका देतच असते. पीएमपी प्रशासनाने बस संचलनाची जबाबदारी योग्यप्रकारे पार पाडायला हवी. स्वस्त आणि पर्यावरणपुरक बससेवा देण्याबाबत मुख्यमंत्री आग्रही आहेत. त्यामुळे भाडेवाढ होऊ देणार नाही, असे शिरोळे यांनी स्पष्ट केले.--------------कोणत्याही प्रकारची भाडेवाढ करण्याचा विचार नाही. चांगल्या दर्जाच्या बस वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. या बस लवकरच आणल्या जातील. भाडेवाढीला पाठिंबा असणार नाही.- मुक्ता टिळक, महापौर 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलDieselडिझेल