शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पीएमपीचे ‘मी कार्ड’ योजना फ्लॉप : दोन वर्षात केवळ २९ हजार कार्डचे वाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 07:00 IST

२०१७ मध्ये तत्कालीन महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते ‘पीएमपी’च्या स्वारगेट येथील कार्यालयात दोन प्रवाशांना प्रातिनिधिक स्वरूपात ‘मी कार्ड’ ही योजना प्रत्यक्षात सुरू करण्यात आली.

ठळक मुद्देपीएमपीने दररोज सुमारे १० लाख प्रवासी करतात प्रवास दोन्ही महापालिका, पीएमपी प्रशासनाच्या उदासिनतेमुळे ‘पीएमपी’च्या ‘स्मार्ट’ स्वप्नांचे ब्रेकडाऊन दोन वर्षात केवळ २९ हजार ५५५ जणांनाच मी कार्ड वाटप ‘पीएमपी’मध्ये सुमारे ८ हजार कर्मचाऱ्यांपैकी केवळ ३ हजार कर्मचाऱ्यांजवळ हे कार्ड

-राजानंद मोरे-  पुणे : स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत दोन वर्षांपुर्वी मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली ‘मी कार्ड’ योजना फ्लॉप ठरली आहे. दोन वर्षात केवळ २९ हजार ५०० मी कार्डचे वितरण करण्यात पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) ला यश आले आहे. दोन्ही महापालिका तसेच पीएमपी प्रशासनाच्या उदासिनतेमुळे ‘पीएमपी’च्या ‘स्मार्ट’ स्वप्नांचे ब्रेकडाऊन होत आहे. पुणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त कुणाल कुमार यांनी स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत अनेक स्मार्ट योजना सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यामध्ये ‘मी कार्ड’चाही समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या योजनांची घोषणा करण्यात आली. त्यानुसार दि. २ जानेवारी २०१७ मध्ये तत्कालीन महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते ‘पीएमपी’च्या स्वारगेट येथील कार्यालयात दोन प्रवाशांना प्रातिनिधिक स्वरूपात ‘मी कार्ड’ ही योजना प्रत्यक्षात सुरू करण्यात आली. यावेळी कुणाल कुमारही उपस्थित होते. त्यावेळी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यापर्यंत पहिल्या टप्प्यात सुमारे ३० हजारांहून अधिक पासधारकांना तर दुसऱ्या टप्प्यात इतर प्रवाशांना मी कार्ड देण्याचे ठरविण्यात आले होते. पीएमपीने दररोज सुमारे १० लाख प्रवासी प्रवास करतात. पण ‘पीएमपी’ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मागील दोन वर्षात केवळ २९ हजार ५५५ जणांनाच मी कार्ड देण्यात आले आहे. त्यामध्ये सर्वाधिक ८ हजार कार्ड अंध, अपंग व इतर पासधारकांना देण्यात आले आहे. पीएमपीने दररोज हजारो पासधारक विद्यार्थी आहे. केवळ २१७ विद्यार्थ्यांना मी कार्ड दिले आहे. ‘पीएमपी’मध्ये सुमारे ८ हजार कर्मचाऱ्यांपैकी केवळ ३ हजार कर्मचाऱ्यांजवळ हे कार्ड आहे. तसेच दोन्ही महापालिकेतील केवळ १७६३ कर्मचाऱ्यांना कार्ड वितरण करण्यात आले आहे. इतर प्रवाशांमध्ये केवळ ३०२ प्रवासी कार्डधारक आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक, पोलिस, नगरसेवक, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, पुरस्कार विजेते यांच्यांसह इतर प्रवाशांची संख्याही नगण्य आहे. दुबार कार्ड घेणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.------------एकुण मी कार्डचे वाटप - २९,५५५पासधारक - सुमारे ८,२१७ज्येष्ठ नागरिक - ९५९प्रवासी - ३०२पीएमपी कर्मचारी - २, ९५०पुणे मनपा कर्मचारी - ११९२पिं.चिं. मनपा कर्मचारी - ५७१नगरसेवक - १७२पोलिस - ८७८इतर - उर्वरित (दुबार, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, निवृत्त कर्मचारी आदी)------------------काय आहे मी कार्ड?स्मार्ट सिटीअंतर्गत एकाच स्मार्ट कार्डच्या माध्यमातून पीएमपी बस, मेट्रो, रेल्वे, टॅक्सी पार्किंग, टोल, खरेदी आदी सुविधा देण्याचे नियोजन होते. या कार्डचे ‘मी कार्ड’ असे नामकरण करण्यात आले आहे. त्यावर प्रवाशाचे नाव, फोटो, जन्मतारीख आहे. या कार्ड रिचार्ज करण्याची सुविधा असून सध्या कार्डधारक प्रवाशांना तिकीट काढावे लागत नाही. पीएमपीच्या कोणत्याही पास केंद्रासह संकेतस्थळावर आॅनलाईन नोंदणी केल्यानंतर हे कार्ड मिळते. त्यासाठी ११८ रुपये शुल्क भरावे लागते...........................प्रवासीही उदासीन‘मी कार्ड’बाबत सर्व पास केंद्रांवर जनजागृती केली जाते. पण त्यानंतरही प्रवाशांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचा दावा पीएमपी अधिकाऱ्यांनी केला आहे. मी कार्डमुळे प्रवाशांना सातत्याने पास केंद्रावर येणे किंवा वाहकाकडून तिकीट घ्यावे लागत नाही. हे कार्ड वापरासाठी सुरक्षित आहे. हे समजावून सांगितल्यानंतरही प्रवाशांकडून कार्ड घेतले जात नसल्याचे अधिकाºयांनी सांगितले.... तर कार्ड बंद होणारशहरात वर्षभरात मेट्रो धावणार आहे. त्यानुसार महामेट्रोचे ‘कॉमन मोबिलिटी कार्ड’ आणण्याचे नियोजन आहे. हे कार्ड मी कार्डप्रमाणेच असणार आहे. पण महामेट्रोने नवीन कार्ड आणल्यास ‘मी कार्ड’ बंद होण्याची शक्यता आहे. हे कार्ड बंद करून त्याऐवजी महामेट्रोचे कार्ड पीएमपी, मेट्रोसाठी वापरले जाईल, असे सुतोवाच महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षीत यांनी नुकतेच केले..................

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPMPMLपीएमपीएमएल