शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपी च्या ‘प्रोत्साहन’ योजनेने वाढले उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 22:00 IST

१५ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या योजनेमध्ये चालक व वाहकांना निश्चित उद्दिष्टापेक्षा जास्त उत्पन्न आणल्यास वाढीव रकमेवर प्रत्येकी १० टक्के भत्ता...

ठळक मुद्देआता '' प्रोत्साहन भत्ता योजना '' आणखी सात मार्गांवर सुरू केली जाणार मागील काही महिन्यांमध्ये पीएमपीचे उत्पन्न तसेच प्रवासी संख्येत घट झाल्याचे चित्र

पुणे : उत्पन्न वाढीसाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) प्रोत्साहन भत्ता योजनेने हात दिला आहे. वाहक व चालकांसाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेमुळे पीएमपीचे तीन मार्गांवरील उत्पन्न वाढल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. त्यामुळे आता ही योजना आणखी सात मार्गांवर सुरू केली जाणार असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली. मागील काही महिन्यांमध्ये पीएमपीचे उत्पन्न तसेच प्रवासी संख्येत घट झाल्याचे चित्र आहे. त्यादृष्टीने उत्पन्न वाढीसाठी पीएमपी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये प्रशासनाने पहिल्या टप्प्यात कात्रज ते पुणे स्टेशन, कात्रज ते शिवाजीनगर व स्वारगेट ते धायरी या तीन बसमार्गांवर सकाळ व दुपार सत्रामध्ये चालक व वाहकांसाठी प्रायोगिक तत्वावर प्रोत्साहन भत्ता योजना सुरू केली. दि. १५ नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या या योजनेमध्ये चालक व वाहकांना निश्चित उद्दिष्टापेक्षा जास्त उत्पन्न आणल्यास वाढीव रकमेवर प्रत्येकी १० टक्के भत्ता दिला जातो. या योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर उत्पन्नामध्ये वाढ झाल्याचा दावा पीएमपी प्रशासनाने केला आहे. त्यासाठी दि.१५ ते ३० ऑक्टोबर या कालावधीतील उत्पन्न आणि दि. १५ ते ३० नोव्हेंबर या कालावधीतील उत्पन्नाची तुलना करण्यात आली आहे. त्यानुसार कात्रज ते पुणे स्टेशन मार्गावरील उत्पन्न सुमारे ४० हजार, कात्रत ते शिवाजीनगर मार्गावरील उत्पन्न सुमारे ६० हजार तर स्वारगेट ते धायरी मार्गावरील उत्पन्न सुमारे १३ हजारांनी वाढले आहे. दैनंदिन उत्पन्नामध्ये तिनही मार्गांवर ७ हजार रुपयांनी वाढ झाली. या सकारात्मक वाढीमुळे प्रशासनाने आणखी सात मार्गांवर ही योजना लागु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दि. २० डिसेंबरपासून खंडोजीबाबा चौक ते एसएनडीटी कॉलेज, पाटील इस्टेट ते दापोडी, सिमला आॅफिस ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, येरवडा ते वाघोली, डेक्कन कॉलेज ते विश्रांतवाडी, महात्मा गांधी बसस्थानक ते हडपसर, भोसरी ते चाकण व आळंदी या मार्गांवर अंमलबजावणी सुरू होईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.---------------प्रोत्साहन भत्ता सुरू असलेले मार्ग उत्पन्न -मार्ग                                          दि. १५ ते ३० ऑक्टोबर                     दि. १५ ते ३० नोव्हेंबर    कात्रज ते पुणे स्टेशन                       १,२०,३५,९६६                                १,६०,२३,६५०कात्रज ते शिवाजीनगर                     २,८६,८८,४६७                                ३,४६,७३,६६८स्वारगेट ते धायरी                           ६३,०४,३७६                                   ७६,३८,७५३------------------------------------------------------एकुण                                            ४,७०,२८,८०९                                ५,८३,३६,०७१-------------------------------------------------------प्रतिदिन उत्पन्न                              २९,३९,३०१                                  ३६,४६,००४

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडे