शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएमपी’तील दांडीबहाद्दर नरमले; गैरहजेरी घटली, तुकाराम मुंढे यांची कारवाई सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 15:26 IST

सातत्याने गैरहजर राहणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) तील कर्मचाऱ्यांना कारवाईचा तडाखा बसु लागला आहे. त्यामुळे असे दांडीबहाद्दर नरमले असून गैरहजेरीचे मोठ्या प्रमाणात खाली आले आहे

ठळक मुद्देकारवाईची टांगती तलवार असल्याने गैरहजेरीप्रमाणेच इतर गैरप्रकारांनाही बसला आळादोन आठवड्यांपूर्वी तब्बल १५८ रोजंदारी हंगामी चालकांना दाखविण्यात आला घरचा रस्ता कोणत्याही कर्मचाऱ्यावर हेतुपुरस्सर कारवाई नाही : तुकाराम मुंढे

पुणे : सातत्याने गैरहजर राहणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) तील कर्मचाऱ्यांना कारवाईचा तडाखा बसु लागला आहे. त्यामुळे असे दांडीबहाद्दर नरमले असून गैरहजेरीचे मोठ्या प्रमाणात खाली आले आहे. कारवाईची टांगती तलवार सातत्याने डोक्यावर असल्याने गैरहजेरीप्रमाणेच इतर गैरप्रकारांनाही आळा बसला आहे.‘पीएमपी’ची निर्मिती झाल्यानंतर मागील दहा वर्षात प्रशासकीय यंत्रणा पुर्णपणे खिळखिळी झाली होती. अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांची उघडपणे मनमानी सुरू असतानाही त्यांच्यावर कारवाई होत नव्हती. गैरहजेरीचे प्रमाण वाढले होते. परिणामी, कामात विस्कळीतपणा आल्याने बस सेवेवर विपरीत परिणाम होत होता. तुकाराम मुंढे यांनी ‘पीएमपी’च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर काही महिन्यांतच या बेशिस्तीला आळा बसला आहे. त्यांनी सातत्याने गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची कुंडलीच तयार केली आहे. त्यामध्ये अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. मागील काही महिन्यांपासून गैरहजेर राहणाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांच्यावर थेट बडतर्फीची कारवाई केली जात आहे. दोन आठवड्यांपूर्वी तब्बल १५८ रोजंदारी हंगामी चालकांना घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून ४५० हून अधिक कर्मचाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. तर कारवाईच्या भीतीने आतापर्यंत १०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. मुंढे यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी गैरहजेरीचे प्रमाण ३० टक्क्यांहून अधिक होते. कारवाई सुरू झाल्यानंतर हे प्रमाण पाच टक्क्यांपेक्षाही कमी झाले आहे. अनेक कर्मचाऱ्यांकडून वरिष्ठांना कोणतीही पूर्वकल्पना न देत दांड्या मारल्या जात होत्या. त्यामुळे दररोज बस फेऱ्या रद्द होण्याचे प्रमाण अधिक होते. कारवाईनंतर गैरहजेरीचे प्रमाण घटल्याने मार्गावरील बस फेऱ्यांमध्येही सातत्य वाढल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. कोणत्याही कर्मचाऱ्यावर हेतुपुरस्सर कारवाई करण्यात आलेली नाही. किंवा यापुढील काळातही ती होणार नाही. नियमांचे उल्लंघन केलेल्या कर्मचाऱ्यांवरच कारवाई होत आहे, असे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे. 

शेकडो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवारगैरहजेरी तसेच बेशिस्त कर्मचाऱ्यांवरील कारवाई यापुढील काळातही सुरूच राहणार आहे. सुमारे १६० रोंजदारी वाहकांची चौकशी सुरू असून लवकरच त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. तसेच अन्य विभागांतील कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. काही वरिष्ठ अधिकारीही चौकशीच्या फेऱ्यात अडकले असून त्यांच्यावरही बडतर्फीची कारवाई होऊ शकते.

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएलtukaram mundheतुकाराम मुंढेPuneपुणे