पीएमपीच्या २५ वातानुकूलित ई-बस मार्गावर : संबंधित मार्गावरील प्रवाशांना मिळाला दिलासा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 01:10 PM2019-02-16T13:10:49+5:302019-02-16T13:20:10+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २५ ई-बसचे लोकार्पण झाले. त्यानंतर मंगळवारपासून मार्गावर १० बस धावण्यास सुरूवात झाली.

On the PMP's 25 AC-E-Bus on Route: Relieving the passengers on the concerned route | पीएमपीच्या २५ वातानुकूलित ई-बस मार्गावर : संबंधित मार्गावरील प्रवाशांना मिळाला दिलासा 

पीएमपीच्या २५ वातानुकूलित ई-बस मार्गावर : संबंधित मार्गावरील प्रवाशांना मिळाला दिलासा 

googlenewsNext
ठळक मुद्देया बससाठी पुणे व पिंपरी चिंचवडमधील एकुण सात मार्ग निश्चित उर्वरीत १५ ई-बसची नोंदणी न झाल्याने झाला उशीर पहिल्या दिवशी आठ ई-बसद्वारे सुमारे ३५ हजार रुपयांचे उत्पन्न भेकराईनगर व निगडी आगारामध्ये ई-बसचे चार्जिंग स्टेशन

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) च्या ताफ्यात नुकत्याच दाखल झालेल्या सर्व २५ वातानुकूलित ई-बस मार्गावर धावू लागल्या आहेत. या बससाठी पुणे व पिंपरी चिंचवडमधील एकुण सात मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित मार्गावरील प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी (दि. ९) २५ ई-बसचे लोकार्पण झाले. त्यानंतर मंगळवारपासून मार्गावर १० बस धावण्यास सुरूवात झाली. केवळ याच बसची नोंदणी न झाल्याने उर्वरीत बस मार्गावर येऊ शकल्या नाहीत. आता उर्वरीत १५ ई-बसचीही नोंदणी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे त्या बसही मार्गावर सोडण्यास सुरूवात झाली आहे. सध्या सर्व २५ ई-बस मार्गावर धावू लागल्या आहेत. भेकराईनगर व निगडी आगारामध्ये ई-बसचे चार्जिंग स्टेशन आहेत. त्यानुसार पुणे व पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनुक्रमे चार व तीन मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. या मार्गावरील प्रवाशांना ई-बसमुळे दिलासा मिळाला आहे. पहिल्या दिवसापासूनच या बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दिवशी आठ ई-बसद्वारे सुमारे ३५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. प्रवाशांना संबंधित बसच्या वेळा माहिती होईल त्याप्रमाणे या बसचा प्रतिसाद वाढत चालला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, दुसऱ्या टप्प्यामध्ये पीएमपीच्या ताफ्यात १२ मीटर लांबीच्या बीआरटीसाठी योग्य असलेल्या १२५ बस घेण्याचे नियोजन आहे. याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन महिन्यात या बसही मार्गावरील येतील. एकुण ५०० ई-बस भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत.
-------------  
या मार्गावर धावणार ई-बस   
१. हडपसर ते पिंपळे गुरव  
बस - ३  
फेऱ्या - ६०  
२. भेकराईनगर ते न. ता. वाडी  
बस - ३  
फेऱ्या - ४८  
३. भेकराईनगर ते पुणे स्टेशन  
बस - ३  
फेऱ्या - ५४  
४. हडपसर ते हिंजवडी माण फेज ३  
बस - ३  
फेऱ्या - १८  
५. डांगे चौक ते हिंजवडी माण फेज ३   
बस - ६  
फेऱ्या - ९६  
६. आकुर्डी रेल्वे स्टेशन ते मनपा  
बस - २  
फेऱ्या - २०  
७. निगडी ते भोसरी  
बस - २  
फेऱ्या - ४८  
----------------

Web Title: On the PMP's 25 AC-E-Bus on Route: Relieving the passengers on the concerned route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.