शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीएमएलचा ब्रेक फेल; दोन महिन्यात दुसरा मोठा अपघात, प्रशासन उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 18:46 IST

अतिक्रमणाच्या विळाख्यातून कधीही न सुटणाऱ्या अप्पर-बिबवेवाडी रस्त्यावरील अतिशय रहदारीच्या डॉल्फिन चौकात पीएमपीचा ब्रेक निकामी झाल्याने अपघात घडला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.

ठळक मुद्देचालक हनुमंत झालटे यांनी गाडी डॉल्फिन चौकाला धडकवली, त्यामुळे टळली जीवितहानीअप्पर-बिबवेवाडी रस्त्यावरील अतिक्रमणे का काढली जात नाहीत?, नागरिकांचा सवाल

बिबवेवाडी : अतिक्रमणाच्या विळाख्यातून कधीही न सुटणाऱ्या अप्पर-बिबवेवाडी रस्त्यावरील अतिशय रहदारीच्या डॉल्फिन चौकात पीएमपीचा ब्रेक निकामी झाल्याने अपघात घडला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.६ नोंव्हेबर रोजी याच ठिकाणी झालेल्या सात वाहनाच्या विचित्र अपघातात एक जणाला आपले प्राण गमावावे लागले होते तर एक व्यक्ती गंभीर जख्मी झाला होता. त्यामुळे येथील अतिक्रमणाचा विषय अनेक दिवस चर्चिला देखील गेला. महापौर मुक्ता टिळक यांनी येथील नगरसेवकासह येथील पाहणी दौरा देखील केला व येथील अतिक्रमणे काढण्याचे आश्वासन नागरिकांना दिले. मात्र येथील अतिक्रमणे जशीच्या तशी आहेत. आज घडलेल्या घटनेत पीएमपी चालक हनुमंत झालटे यांनी आपल्या कौशल्याने गाडी डॉल्फिन चौकाला धडकवली, त्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. अन्यथा अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असते.दुपारी ३.५० च्या सुमारास १० प्रवासी घेऊन ही स्वारगेट डेपोची बस (क्रमांक एम एफ १२ एफ सी ९४७६) खंडोबा मंदिर येथून शिवाजी नगरला चालली होती. अप्पर-बिबवेवाडी रस्त्यावर वळताच तीव्र उतारावर ज्या ठिकाणी ६ नोंव्हेबरचा भीषण अपघात झाला होता, त्याच ठिकाणी बसचा ब्रेक निकामी झाला. बसचा हँण्ड ब्रेक दोरीने बांधून ठेवलेला होता. म्हणजेच तो ही निकामी होता. त्यामुळे चालकाने जोरात ओरडत रस्त्यावरील नागरिक व वाहनांना दूर केले व गाडी डॉल्फीन चौकावर नेऊन आदळली. या अपघातामध्ये चालक हनुमंत झालटे जखमी झाले असून गाडीतील काही प्रवाशांना किरकोळ मार लागला आहे.

खिळखिळ्या गाड्या किती प्रवाशांचा जीव गेल्यावर बदलणार?या अपघातामुळे पीएमपीच्या या खिळखिळ्या झालेल्या गाड्या किती प्रवाशांचा जीव गेल्यावर बदलल्या जाणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच अप्पर-बिबवेवाडी रस्त्यावरील अतिक्रमणे का काढली जात नाहीत, हा देखील प्रश्न येथील स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. मताच्या राजकारणासाठी अतिक्रमणांवर कारवाई न करणे नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. स्थानिक नगरसेविका रुपाली धाडवे यांनी पीएमपीच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचे यावेळी सांगितले. अप्पर भागामध्ये नवीन बस देण्याची मागणी देखील त्यांनी या पूर्वीच प्रशासनाकडे केलेली आहे.अप्पर-बिबवेवाडी हा रस्ता अतिशय महत्त्वाचा व रहदारीचा रस्ता आहे. सहकारनगर वाहतूक विभागाचा एकही अधिकारी या अपघातग्रस्त भागामध्ये कधीही वाहतूक सुरळीत करण्यासाठी नसतो. त्यामुळे देखील अनेक अपघातांना येथील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएलSwargateस्वारगेटPuneपुणे