शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएमपी’ची सोमवारी विक्रमी ‘धाव’; दोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविण्याचे उद्दिष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 12:40 IST

बसमधील गर्दीचा त्रास सहन करणाऱ्या प्रवाशांना सुखद धक्का मिळणार

ठळक मुद्दे१७०० बस मार्गावर आणणार : दररोज बसच्या २१ हजार ते २२ हजार फेऱ्या होणे अपेक्षित‘पीएमपी’च्या बससेवेला प्रत्येक सोमवारी गर्दी

पुणे : दैनंदिन नियोजनापेक्षा १५० ते २०० बस मार्गावर कमी येणे, चार हजारांहून अधिक फेऱ्या रद्द होत असल्याने तासन्तास बसथांब्यावर ताटकळत उभ्या राहणाऱ्या आणि बसमधील गर्दीचा त्रास सहन करणाऱ्या प्रवाशांना सोमवारी (दि.१०) सुखद धक्का मिळणार आहे. यादिवशी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) मार्गावर १७०० बस सोडण्याचे नियोजन केले आहे. तसेच दोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ‘पीएमपी’कडून दररोज सुमारे १६८५ ते १७०० बस मार्गावर सोडण्याचे नियोजन केले जाते. या नियोजनानुसार दररोज बसच्या २१ हजार ते २२ हजार फेऱ्या होणे अपेक्षित असते. पण प्रत्यक्षात दररोज नियोजन कोलमडत असल्याने अपेक्षित बस मार्गावर येत नाहीत. किमान १४५० ते १५५० बस मार्गावर येत असल्याने चार ते साडे चार हजार फेºया रद्द कराव्या लागतात. परिणामी, प्रवाशांना बसथांब्यांवर बराच वेळ थांबावे लागत आहे. अनेकदा बसमधून गर्दीतून जाण्याची वेळ येते. पीएमपीच्या ताफ्यात आता ६०० हून अधिक नवीन बस दाखल झाल्या आहेत. तसेच भाडेतत्त्वावरील सुमारे १२५ ई-बस ताफ्यात आल्या आहेत. पण त्यानंतरही मार्गावरली बससंख्या अपेक्षित वाढली नव्हती. चालक व वाहकांअभावी तसेच दुरुस्तीच्या कारणास्तव अनेक बस आगारातच उभ्या राहत होत्या. तसेच कर्मचाºयांचे गैरहजेरीचे प्रमाणही अधिक होते. आता कर्मचाºयांच्या गैरहजेरीवर नियंत्रण मिळविले जात आहेत. अधिकाधिक बस मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून सोमवारी (दि. १०) जवळपास १७०० बस मार्गावर आणल्या जाणार आहेत. त्यासाठी चालक वाहकाच्या साप्ताहिक सुट्ट्या रद्द करून सर्व वाहक चालक प्रवासी सेवेत हजर राहणार आहेत. सर्व चालक वाहकांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. तसेच मध्यवर्ती कार्यालयांसह सर्व आगारातील कंट्रोलर, चेकर, अधिकारी मार्गावर उतरून प्रवाशांना मार्गदर्शन करणार आहेत. प्रवाशांना नियमित व अधिक चांगली बससेवा मिळावी, यासाठी हे नियोजन केले जात आहे. या माध्यमातून दोन कोटी रूपये उत्पन्नाचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. त्यासाठी सर्व आगार स्तरावर नियोजन केले जात आहे. ........प्रत्येक सोमवारी अधिक बस‘पीएमपी’च्या बससेवेला प्रत्येक सोमवारी गर्दी असते. त्यामुळे या दिवशी अधिकाधिक बस सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांना अधिक चांगली बस सुविधा मिळावी, यादृष्टीने प्रयत्न आहे. दि.१० फेब्रुवारीनंतर प्रत्येक सोमवारी १७०० बस सोडण्यासाठी प्रयत्न केले जातील. - अनंत वाघमारे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएल