पीएमपी कामगार होणार कायम
By Admin | Updated: May 24, 2014 05:04 IST2014-05-24T05:04:41+5:302014-05-24T05:04:41+5:30
पीएमपीमधील कंत्राटी पदे रद्द करून जे सेवक सध्या कंत्राटी आहेत,

पीएमपी कामगार होणार कायम
पुणे : पीएमपीमधील कंत्राटी पदे रद्द करून जे सेवक सध्या कंत्राटी आहेत, त्यांना डेली वेजेस (बदली हंगामी रोजंदारी) या पदावर नियुक्त करण्याचे आदेश प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत. तसेच, ज्या डेली वेजेस सेवकांना सेवेमध्ये २ वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यांना कायम करण्यात येईल, असा निर्णय पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आर. एन. जोशी यांनी दिला. महाराष्ट्र कामगार मंचाच्या पदाधिकार्यांसमवंत बैठक झाली. तीमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या वेळी संघटनेचे अध्यक्ष दिलीप मोहिते, राजेंद्र बाळशंकर आदी उपस्थित होते. पूर्व पीएमटी आणि पूर्व पीसीएमटी असलेली रिक्त पदे भरण्याबाबत संघटनेने पाठपुरावा केला होता. मोहिते म्हणाले, ‘‘कंत्राटी पदावर असताना जमा झालेली भविष्यनिर्वाह निधीची रक्कम डेली वेजेस पदावर वर्ग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मृत्युदंड रकमेमध्ये वाढ करण्याबाबत चर्चा झाली होती. यामध्ये मृत सेवकांच्या कुटुंबीयांना १० हजार रुपये देण्यात येत होते. आता २५ हजार रुपये देण्याबाबत ८ दिवसांत प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आले आहे. सेवाज्येष्ठतेनुसार काम देण्याची कारवाई ३ आठवड्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे.’’ (प्रतिनिधी)