पीएमपी कामगारांचे कुटुंबीयही आंदोलनात

By Admin | Updated: November 29, 2014 00:08 IST2014-11-29T00:08:52+5:302014-11-29T00:08:52+5:30

पुणो महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) दुरुस्ती अभावी बंद असलेल्या बसेसमुळे अनेक कामगारांचा रोजगार गेला आहे.

The PMP workers' family also protested | पीएमपी कामगारांचे कुटुंबीयही आंदोलनात

पीएमपी कामगारांचे कुटुंबीयही आंदोलनात

पुणो : पुणो महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) दुरुस्ती अभावी बंद असलेल्या बसेसमुळे अनेक कामगारांचा रोजगार गेला आहे. त्यामुळे या कामगारांना कुटुंब चालविणो कठीण होऊ लागले आहे. याचा संताप व्यक्त करण्यासाठी शुक्रवारी या कामगारांच्या कुटुंबातील महिलांनी पीएमपी कार्यालयासमोर आंदोलन केले. 
पीएमपीच्या 125क् बसेसपैकी सुमारे 65क् बसेस दुरुस्तीअभावी बंद आहेत. परिणामी रोजंदारीवरील अनेक चालक व वाहकांचा रोजगार बंद झाला आहे. पीएमपी प्रशासनाने या कामगारांची भरती करून रोजगार देण्याची हमी दिली होती. मात्र, बस बंद असल्याने आता त्यांना काम देणो शक्य होत नाही. त्यामुळे दररोज शेकडो कामगार काम नसल्याने घरी बसून आहेत. याविरोधात महाराष्ट्र कामगार मंचाच्या वतीने ‘काम द्या’ या मागणीसाठी गुरुवारपासून उपोषण सुरू केले आहे, असे मंचचे अध्यक्ष दिलीप मोहिते यांनी सांगितले.
शुक्रवारी कामगारांच्या कुटुंबीयांनी पीएमपी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रवीण अष्टीकर यांनी त्यांना चर्चेसाठी बोलावले होते. या वेळी चर्चेदरम्यान महिलांनी आक्रमक पवित्र घेत काम न दिल्यास, आत्महत्या करण्याचा इशारा दिला. ‘घरातील कत्र्या व्यक्तीचे काम गेल्याने, कुटुंबावर आर्थिक संकट ओढावले आहे. घरखर्च भागविणो कठीण जात आहे. अधिका:यांनी 
याचा विचार करून कामगारांना काम द्यावे,’ अशी मागणी काही महिलांनी केली. (प्रतिनिधी)

 

Web Title: The PMP workers' family also protested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.