पीएमपी तिकीट दरवाढ टळली

By Admin | Updated: May 23, 2014 04:50 IST2014-05-23T04:50:37+5:302014-05-23T04:50:37+5:30

डिझेल आणि सीएनजी दरवाढीचे कारण पुढे करीत प्रशासनाने सुचविलेला तिकीट दरवाढीचा प्रस्ताव संचालक मंडळाने फेटाळला.

PMP ticket price hike | पीएमपी तिकीट दरवाढ टळली

पीएमपी तिकीट दरवाढ टळली

पुणे : डिझेल आणि सीएनजी दरवाढीचे कारण पुढे करीत प्रशासनाने सुचविलेला तिकीट दरवाढीचा प्रस्ताव संचालक मंडळाने फेटाळला. तसेच, पुढील सहा महिन्यांमध्ये होणार्‍या पीएमपी संचलनाचा अभ्यास करून तिकीट दरवाढीपेक्षा उत्पन्नाचे इतर स्रोत शोधावेत, असे संचालकांनी प्रशासनाला सांगितले. पीएमपी संचालक मंडळाची बैठक स्वारगेट येथील मुख्यालयात पार पडली. या वेळी पुण्याच्या महापौर चंचला कोद्रे, स्थायी समिती अध्यक्ष बापूराव कर्णे (गुरुजी), अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, नगरसेवक प्रशांत जगताप, पिंपरी-चिंचवड महापौर मोहिनी लांडे, आयुक्त राजीव जाधव, सीआरटीचे दामले, पीएमपीचे अध्यक्ष आर. एन. जोशी, मयूरा शिंदेकर आदी उपस्थित होते. डिझेल दरवाढ झाल्याने पीएमपीच्या तोट्यात वाढ होत असल्याचे सांगत दरवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला. परंतु, पुणेकरांवर बोजा पडू नये, याकरिता दरवाढ फेटाळण्यात आल्याचे संचालक प्रशांत जगताप यांनी सांगितले. जगताप म्हणाले, ‘‘पुढील सहा महिने दरवाढ होऊ नये, याकरिता इतर स्रोत शोधून अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.’’

Web Title: PMP ticket price hike