शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपी अध्यक्षा नयना गुंडे यांची बदली; रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी नवे अध्यक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 19:57 IST

तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर गुंडे यांच्याकडे आली होती पीएमपीची जबाबदारी

ठळक मुद्दे गुंडे यांच्याकडे पुण्यातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्तपदाची जबाबदारी

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांची शासनाने नियुक्ती केली आहे. गुंडे यांच्याकडे पुण्यातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.नयना गुंडे यांनी दि. १२ फेब्रुवारी २०१८ रोजी पीएमपीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला होता. तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांची केवळ दहा महिन्यांतच बदली करण्यात आली होती. त्यानंतर गुंडे यांच्याकडे पीएमपीची जबाबदारी आली. त्यांनाही केवळ १ वर्ष ११ महिन्यांचा कालावधी मिळाला. त्यांच्या कार्यकाळामध्ये पीएमपीच्या ताफ्यात १५० इलेक्ट्रीक बस, २०० मिडी बस तर सुमारे ४०० सीएनजी बस दाखल झाल्या. कंपनी स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पीएमपीला बस मिळाल्या आहेत. त्यांनी बस खरेदी व भाडेतत्वाची प्रक्रिया वेगाने पार पाडली. देशात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेत ई-बस दाखल झाल्या. भेकराईनगर व निगडी हे दोन आगार देशातील पहिले ई-आगार ठरले.  महिलांसाठी तेजस्विनी बससेवा सुरू करण्याचा मानही गुंडे यांना जातो. महिलांसाठी ५० हून अधिक बस सुरू करण्यात आल्या. मागील काही वर्षांपासून रेंगाळलेले आस्थापना आराखड्याचे कामही त्यांनी सुरू केले. त्यानुसार नुकतेच १४०० कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात आले. लवकरच या आराखड्याची अंमलबजावणी पुर्ण क्षमतेने होईल. पण बसस्थानकांच्या दुरावस्थेमध्ये फरक पडलेला नाही. मुख्य बसस्थानकांवर प्रवाशांना सुविधा मिळत नाहीत. स्थानकांवर वेळापत्रक नसणे, बसचे ब्रेकडाऊन रोखणे, ठेकेदारांकडील बसची स्थिती, बस आगारांचा विकास, बसला होणारा विलंब, संगणकीकरण, कुशल कर्मचारी भरती अशा विविध मुद्यांवर प्रशासन सातत्याने अपयशी ठरले आहे. सुर्यवंशी यांच्यासमोरही ही आव्हाने असणार आहे. ---------------- 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडेTransferबदलीRaigadरायगडState Governmentराज्य सरकार