शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीचे आता ‘मागणीनुसार पुरवठा’ धोरण : मार्ग आणि बसस्थानकांचा अभ्यास सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 21:16 IST

‘पीएमपी’कडून पुणे व पिंपरी चिंचवडसह लगतच्या भागातील प्रवाशांसाठी बससेवा पुरविली जाते. सुमारे ३०० मार्गांवरून दररोज जवळपास २२ हजार फेऱ्यांचे नियोजन केले जाते. पण प्रत्यक्षात सुमारे १७ हजार फेऱ्याच होतात.

ठळक मुद्देप्रवाशांची गर्दी, मागणी पाहून संबंधित मार्गांवर बस सोडण्याच्या विचाराधीन गरजेनुसार तंत्रज्ञानाचाही उपयोग प्रवासी संघटना, प्रवासी, वाहतुक पोलिस, दोन्ही महापालिका, यांचीही मदत घेतली जाणार

राजानंद मोरे पुणे : एखाद्या मार्गावर प्रवाशांची गर्दी अधिक अन् बसेसची संख्या कमी असते. कधी बसेसच्या ब्रेकडाऊनमुळे वेळापत्रक कोलमडते. त्यामुळे बस प्रवाशांनी ओसंडून वाहतात. त्याचवेळी इतर मार्गांवर एकामागोमाग तीन-चार बसेस रिकाम्या धावताना दिसतात. ही विसंगती दुर करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) ‘मागणीनुसार पुरवठा’ हे धोरण अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची गर्दी, मागणी पाहून संबंधित मार्गांवर बस सोडण्याच्या विचाराधीन आहे. त्यासाठी विविध मार्गांचा अभ्यासही सुरू करण्यात आला आहे.  ‘पीएमपी’कडून पुणे व पिंपरी चिंचवडसह लगतच्या भागातील प्रवाशांसाठी बससेवा पुरविली जाते. सुमारे ३०० मार्गांवरून दररोज जवळपास २२ हजार फेऱ्यांचे नियोजन केले जाते. पण प्रत्यक्षात सुमारे १७ हजार फेऱ्याच होतात. नियोजित बसेच्या तुलनेत प्रत्यक्षात मार्गावर येणाऱ्या बसेसची संख्या यामध्ये मोठी तफावत आहे. तसेच मार्गावर बस बंद पडण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. त्यामुळे काही मार्गांवर नियोजित वेळापत्रक कोलमडते. दोन बसेसमधील वेळेचे अंतर वाढते. अपेक्षेपेक्षा कमी बस मार्गावर आल्याने ठराविक बसेसला गर्दी होते. प्रवाशांना तासन् तास बसथांब्यावर ताटकळत उभे राहावे लागते. प्रामुख्याने सकाळी ८ ते १२ आणि सायंकाळी ४ ते आठ यावेळेत विद्यार्थी व चाकरमान्यांची बसेसला गर्दी असते. दुपारच्या वेळेत तुलनेने बस रिकाम्या धावतात. तर काही मार्गांवर गर्दी नसतानाही बस सोडल्या जातात. त्यामुळे एकामागोमाग रिकाम्या बस जातात. एका मार्गावर रिकाम्या तर दुसऱ्या मार्गावर भरून वाहणाऱ्या बसेसचे विसंगत चित्र नेहमीच दिसते. ही स्थिती बदलण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत.------------मागणीनुसार बसएखाद्या मार्गावर अपेक्षित बस न आल्यास किंवा ब्रेकडाऊनमुळे वेळापत्रक कोलमडल्यास प्रवाशांची गर्दी होते. ही गर्दी कमी करण्यासाठी ‘पीएमपी’कडून संबंधित मार्गावर जादाची बस सोडण्याचे नियोजन केले जात आहे. तसेच सकाळी किंवा सायंकाळी काही ठराविक मार्गांवर गर्दी असते. या मार्गांवर गरजेनुसार बस सोडल्या जातील. काही मार्गांवर मागणी नसूनही जादा बस असतात. या मार्गांवर प्रवाशांचा प्रतिसाद पाहून बस सोडण्याबाबत निर्णय घेतला जाईल. त्यासाठी गरजेनुसार तंत्रज्ञानाचाही उपयोग केला जाईल.-----------------अभ्यास सुरूपीएमपी प्रशासनाकडून प्रवाशांची गर्दी व मागणीनुसार बस सोडण्याबाबत अभ्यास सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी प्रवासी संघटना, प्रवासी, सीआयआरटी, वाहतुक पोलिस, दोन्ही महापालिका, स्मार्ट सिटी प्रकल्प यांचीही मदत घेतली जाणार आहे. सुमारे ७० ते ८० मार्ग गर्दीचे आहेत. या मार्गांवर बसेसला मागणी असते. पण बसेसच्या उपलब्धतेअभावी ते शक्य होत नाही. सध्या नवीन १३२ मिडी बस दाखल झाल्या असून आणखी शंभर बस लवकरच येतील. त्यानुसार या गाड्यांचे गर्दीच्या मार्गावर नियोजन करण्याबाबत अभ्यास सुरू आहे.प्रवाशांच्या मागणीनुसार बस सेवा देण्याबाबत अभ्यास सुरू करण्यात आला आहे. गर्दीवेळी ठराविक मार्गांवर बसेसची संख्या वाढविण्यात येईल. ब्रेकडाऊन किंवा इतर कारणांमुळे एखाद्या मार्गावर बस कमी असतील तर जादाची बस मार्गावर सोडण्याचे नियोजन केले जाईल. ‘मागणीनुसार पुरवठा’ या तत्वानुसार बस सोडण्याचे विचाराधीन आहे.- अजय चारठणकर, महाव्यवस्थापक (प्रशासन)पीएमपीएमएल----------------सध्याचे बसमार्गनियमित - २४२बीआरटी - ४४वातानुकूलित - ३रातराणी - ६ स्कुल बस - ७गर्दीचे मार्ग - ७० ते ८०---------------------

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडेTravelप्रवास