‘पीएमपी’कडून होतेय धूळफेक

By Admin | Published: June 12, 2017 01:26 AM2017-06-12T01:26:24+5:302017-06-12T01:26:24+5:30

पीएमपीने पिंपरी-चिंचवडमध्ये किती बस वाढविल्या आणि उत्पन्नात किती वाढ झाली, हे सांगणे म्हणजे नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार आहे

Dump from PMP | ‘पीएमपी’कडून होतेय धूळफेक

‘पीएमपी’कडून होतेय धूळफेक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पीएमपीने पिंपरी-चिंचवडमध्ये किती बस वाढविल्या आणि उत्पन्नात किती वाढ झाली, हे सांगणे म्हणजे नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार आहे. २००७ आणि २०१७ च्या लोकसंख्येत दुप्पट वाढ झाली असताना शहरांतर्गत बससेवा सक्षम नाही, हा खरा मुद्दा आहे. शहरांतर्गत बससेवेची काय स्थिती आहे, याबाबत पीएमपीचे अध्यक्षांनी जनतेला सांगावे. शहरात फेरफटका मारून वस्तुस्थिती जाणून घ्यावी, अशी मागणी स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी केली आहे.
सावळे म्हणाल्या, ‘‘पिंपरी-चिंचवडमधील अंतर्गत बसव्यवस्था सक्षम करावी आणि आसपासच्या गावांना शहराशी जोडण्यात यावे, अशी आमची मागणी आहे. परंतु, पीएमपी प्रशासन २००७ आणि २०१७ मधील आकडेवारी प्रसिद्ध करून केवळ स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. २००७ मध्ये पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या दहा लाखांच्या घरात होती. २०१७ मध्ये ती २२ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. या दहा वर्षांत पुण्याचीही लोकसंख्या दुप्पट झाली आहे. त्यामुळे पुण्यातील प्रवासीही पिंपरी-चिंचवडमध्ये दररोज हजारोंच्या संख्येने येतात. लोकसंख्या दुप्पट झाली म्हणून पीएमपीच्या उत्पन्नातही वाढ होणे अपेक्षित आहे आणि तशी वाढ झाली आहे. पूर्व पीएमपी आणि पूर्व पीसीएमटी अस्तित्वात असताना शहरातून पुण्याच्या सर्व प्रमुख भागात बस धावत होत्या.

Web Title: Dump from PMP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.