शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

दीड कोटी उत्पन्नासाठी पीएमपीला पाहावी लागली तब्बल अकरा दिवस वाट; उत्पन्न व खर्चाचा बसेना ताळमेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 7:43 PM

पीएमपी सुरू होऊन दहा दिवस उलटले तरी प्रवाशांची अजून प्रतीक्षाच....

ठळक मुद्देअपेक्षित प्रवाशी न लाभल्याने पीएमपीला सहन करावा लागतोय तोटा

पुणे : बससेवा सुरू होऊन दहा दिवस उलटले तरी प्रवाशांचा अद्याप अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. लॉकडाऊनपुर्वी एका दिवसांत मिळणारे सुमारे दीड कोटी उत्पन्नासाठी अकरा दिवस लागले आहेत. तसेच सध्या मिळणारे उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने मोठा तोटा सहन करावा लागत आहे. सध्या पीएमपीला प्रति किलोमीटर सुमारे ६० रुपये खर्च येत असून उत्पन्न केवळ १० ते १२ रुपये एवढे आहे. त्यामुळे पीएमपीला जेमतेम इंधन खर्च भागण्याइतपत उत्पन्न मिळत आहे.

कोरोना संकटामुळे २३ मार्चपासून पीएमपी बससेवा बंद होती. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी १०० ते १२५ बस मार्गावर धावत होत्या. लॉकडाऊनची बंधने शिथिल केल्यानंतर सर्व व्यवहार सुरळीत होऊ लागले. त्यामुळे पीएमपी सेवा सुरू करण्याची मागणी होत होती. त्यानुसार ३ सप्टेंबरपासून २५ टक्के बस मार्गावर आणण्याचा निर्णय घेण्यात आला. पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये सुमारे ४२५ बस मार्गावर धावत आहेत. पहिल्या दिवशी सुमारे ८१ हजार प्रवाशांनी बसने प्रवास केला. त्यातून ११ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यानंतर दिवसेंदिवस प्रवाशांचा आकडा वाढत चालला आहे. दि. १० सप्टेंबर रोजी हा आकडा सव्वा लाखांच्या पुढे तर उत्पन्नही १८ लाखांच्या पुढे गेले आहे.

अपेक्षित प्रवासी मिळत नसल्याने पीएमपीला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. लॉकडाऊनपुर्वी पीएमपीचे दैनंदिन उत्पन्न सुमारे दीड कोटी तर प्रवासी संख्या दहा लाखांच्या पुढे होती. तर दैनंदिन प्रति किलोमीटर खर्च ७० ते ८० रुपये आणि उत्पन्न सुमारे ५० रुपये मिळत होते. पण सध्या मिळणारे उत्पन्न १० ते १२ रुपयांपर्यंत खाली आले आहे. तर खर्च सुमारे ६० रुपये एवढे आहे. त्यामुळे खर्च व उत्पन्नाचा ताळमेळ बसताना दिसत नाही.------------पीएमपीचे दैनंदिन प्रवासी व उत्पन्नदिवस             प्रवासी             उत्पन्न३ सप्टेंबर         ८१,१६२         ११,१८,१३६४ सप्टेंबर          ९८,३७५        १४,०२,८९०५ सप्टेंबर         ९७,११३         १३,५५,३६०६ सप्टेंबर          ८२,६२८        १०,९४,५९८७ सप्टेंबर          १,२०,२७७     १७,५२,६४६८ सप्टेंबर          १,२१,१७९     १७,४६,२५७९ सप्टेंबर           १,२२,५९२    १७,२३,८३३१० सप्टेंबर        १,२८,४६३     १८,३९,६२१११ सप्टेंबर         १,२७,९५१    १८,०५,६९११२ सप्टेंबर         १,२२,००९    १६,९०,०९४१३ सप्टेंबर          १,०३,१६४।  १३,८५,५६४---------------------------------------- शाळा, महाविद्यालये बंद- कोरोनाची भिती- अनेकांकडून खासगी वाहनांचा वापर- कार्यालयांमध्ये कमी उपस्थिती- दैनंदिन व्यवहारांवर मर्यादा

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPMPMLपीएमपीएमएल