शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘बस डे’ला पीएमपी उद्दिष्टापासून दूर; पावणेदोन कोटींची कमाई झाल्याचा प्रशासनाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 12:13 IST

‘बस डे’चे निमित्त साधत पीएमपीने ठेवलेले दोन कोटी रुपये उत्पन्नचे उद्दिष्ट

ठळक मुद्देप्रवाशांना दिलासा मिळाल्याने प्रशासनाच्या प्रयत्नांचे कौतुकमागील दोन वर्षांमध्ये पीएमपीच्या ताफ्यात ७०० हून अधिक नवीन बस दाखल प्रवासी संख्येत किमान एक लाखाने वाढ झाल्याचा दावा

पुुणे : ‘बस डे’चे निमित्त साधत पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) ठेवलेले दोन कोटी रुपये उत्पन्नचे उद्दिष्ट साध्य झाले नाही. पण प्रवासी संख्येत किमान एक लाखाने वाढ झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. कारण सोमवारी प्रवासी वाढल्याने फेब्रुवारी महिन्यात एकूण १ कोटी ८३ लाख हे विक्रमी उत्पन्न मिळाल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, उत्पन्नाचे उद्दिष्ट साध्य झाले नसले तरी प्रवाशांना दिलासा मिळाल्याने प्रशासनाच्या प्रयत्नांचे कौतुक होत आहे. मागील दोन वर्षांमध्ये पीएमपीच्या ताफ्यात ७०० हून अधिक नवीन बस दाखल झाल्या आहेत. तसेच चालक व वाहकांची संख्याही वाढली आहे. तिकीट उत्पन्नातील पीएमपीला १ कोटी ५० लाख रुपये तर पास विक्रीतून ५० लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात तिकीट विक्रीतून १ कोटी ४४ लाख तर पासमधून केवळ ३८ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. त्यानुसार एकुण १ कोटी ८३ लाख ५३ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मागील महिन्यात अधिकच्या बस मार्गावर नसतानाही १ कोटी ८९ लाख रुपयांचे उच्चांकी उत्पन्न मिळाले. यामध्ये पास विक्रीचा वाटा ४८ लाख रुपयांचा होता. पण बस डे दिवशी १८०० हून अधिक बस मार्गावर येऊनही दैनंदिन पासला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. तिकीट विक्रीतून उच्चांकी उत्पन्न मिळाले असले तरी पासची मदत न झाल्याने प्रशासनाला उद्दिष्ट साध्य करता आले नाही. फेब्रुवारी महिन्यातील हे विक्रमी उत्पन्न असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. फेब्रुवारी महिन्यातील उत्पन्न १ कोटी ५० लाख ते १ कोटी ६० लाखांपर्यंतच मिळाले होते. बस डेमुळे हा आकडा १ कोटी ८३ लाखांवर गेल्याचे त्यांनी सांगितले. नियमितपणे १ कोटी ५० लाख रुपये उत्पन्न मिळाल्यानंंतर सुमारे ११ ते १२ लाखांच्या दरम्यान प्रवासी संख्या असते, असे आकडेवारीवरून स्पष्ट होते. आता हे उत्पन्न १ कोटी ८३ लाखांवर गेल्याने प्रवासी संख्या सुमारे १ लाखांपर्यंत वाढ झाल्याचे स्पष्टपणे दिसते. तिकीट विक्री वाढल्याने हा आकडा निश्चितपणे वाढल्याचे अधिकाºयांनी सांगितले.  ........ब्रेकडाऊनला ब्रेक.विक्रमी १८३३ बस मार्गावर येऊनही ब्रेकडाऊनचे प्रमाण मर्यादित राखण्यातही प्रशासनाला यश मिळाले. दररोज सरासरी १५०० ते १५५० बस मार्गावर असताना १२५ च्या पुढे बस मार्गावरच बंद पडत होत्या. पण सोमवारी ‘पीएमपी’च्या मालकीच्या केवळ ४५ तर भाडेतत्त्वावरील सुमारे ५० बसचे ब्रेकडाऊन झाले. त्यामुळे प्रवाशांनाही दिलासा मिळाला. 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलpassengerप्रवासी