शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात 'पीएमपी'च्या बससेवा विस्तारणार; एमआयडीसी, पर्यटन व तीर्थस्थळांपर्यंत धावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 16:52 IST

मागील काही वर्षांपासून पीएमपी बससेवेने पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सीमा ओलांडून ग्रामीण भागातही बससेवा सुरू केली आहे.

पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड शहराच्या वाढीत महत्वाचा वाटा असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बससेवाचा विस्तार केला जाणार आहे. येत्या १२ डिसेंबरपासून ही सेवा जेजुरी एमआयडीसी, यवत, राहु, सारोळा आदी ठिकाणांपर्यंत सुरू केली जाणार आहे. त्यानुसार एकुण १२ नवीन मार्गांचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी दिली.

मागील काही वर्षांपासून पीएमपी बससेवेने पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सीमा ओलांडून ग्रामीण भागातही बससेवा सुरू केली आहे. या सेवेला उत्स्फुर्त प्रतिसादही मिळत आहे. आता ही धाव आणखी वाढविली जात आहे. दोन्ही शहरालगत मोठ्या प्रमाणावर औद्योगिक क्षेत्र विकसित झाले आहे. तसेच पर्यटन व तीर्थस्थळे असल्याने बससेवा या भागापर्यंत सुरू करण्याची मागणी होत होती. संचालक मंडळाने पीएमआरडीए हद्दीपर्यंत सेवा सुरू करण्याची मान्यता दिलेली आहे. त्यानुसार पुर्वी सासवडपर्यंत असलेली सेवा आता जेजुरी एमआयडीसीपर्यंत वाढविण्यात आली आहे. सोलापुर मार्गावरही उरळीपर्यंत असलेली बस यवतपर्यंत धावेल. तसेच इतर मार्गांवरही बदल करून त्याचा विस्तार करण्यात आला आहे. एकुण १२ नवीन मार्ग निश्चित करण्यात आले असून त्यासाठी ७० बसचे नियोजन करण्यात आले आहे.-----------------दोन महिन्यांपासून नियोजन सुरू होते. मार्गांचे सर्वेक्षण करून थांबे व दर निश्चित करण्यात आले. पुढील तीन महिन्यांसाठी ही प्रायोगिक तत्वावर सेवा सुरू राहील. मिळणाºया प्रतिसादानुसार त्यात बदल केले जातील.- राजेंद्र जगताप, अध्यक्ष, पीएमपी-------------------नव्याने सुरू केलेले मार्ग (कंसात वारंवारिता)कात्रत ते सारोळा (३० मि.), हडपसर ते यवत (४० मि.), डेक्कन ते भुगाव (२५ मि.), वाघोली ते राहू (१ तास), वाघोली ते रांजणगाव (३० मि.), हडपसर-फुरसूंगी-हडपसर (३० मि.), हडपसर ते घोरपडी (१५ मि.), सासवड ते जजुरी एमआयडीसी (२० मि.), चाकण ते तळेगाव दाभाडे (२० मि.), पिंपरी रोड ते स्पाईन मॉल (३० मि.), पिंपरी रोड ते वारजे माळवाडी (३५ मि.), चाकण ते शिक्रापुर (२० मि.)-----------

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलpassengerप्रवासी