शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

पीएमपी चालकाची मुजाेरी ; ज्येष्ठ नागरिकांना दिली दात पाडण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 21:21 IST

ज्येष्ठ नागरिकांना दाद पाडण्याची धमकी देऊन त्यांना घाबरविण्याचा धक्कादायक प्रकार समाेर अाला अाहे.

पुणे :  पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अाधीच सक्षम नसताना पीएमपीच्या कर्मचाऱ्यांच्या उद्धट वागण्यामुळे नागरिकांना अधिकच मनस्तापाला सामाेरे जावे लागत अाहे. अप्पा बळवंत चाैक येथून सांगवीकडे जाणाऱ्या बसमध्ये चढण्यावरुन ज्येष्ठ नागरिक अाणि बस चालकामध्ये वाद झाल्याने बस चालकाने ज्येष्ठ नागरिकांना दात पाडण्याची धमकी दिली. तसेच अनेकदा बसचे जाेरात ब्रेक दाबून जेष्ठ नागरिकांना घाबरविण्याचा धक्कादायक प्रकार घडला अाहे. 

    हा प्रकार मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास घडला. महापालिका भवन येथे ज्येष्ठ नागरिक शरद महाजन( वय 78) अाणि सुधा महाजन (वय 76) हे पतीपत्नी सांगवीच्या बसची वाट पाहत उभे हाेते. बस अाल्यानंतर या दाेघांना बसमध्ये चढण्यास वयाेमानामुळे काहीसा उशीर झाल्याने बसचालक अाणि या दाेघांमध्ये वाद झाले. सुधा महाजन यांच्या कंबरेची दाेन वर्षापुर्वी शस्त्रक्रीया झाल्याने चालताना त्रास हाेताे, तसेच वयाेमानामुळे पटपट चालता येत नसल्याचे चालकाला सांगितले.  परंतु चालकाने कुठलिही सहानभूती न दाखवता तसेच त्यांच्या वयाचा विचार न करता दाेघांना अर्वाच्य भाषेत भिवीगाळ केली. तसेच बसचा जाेरात ब्रेक दाबून दात पाडण्याची धमकी सुद्धा दिली. नुसती धमकीच नाही तर चालकाने अनेकदा जाेरात ब्रेक दाबून या दाेघांना घाबरविण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे भयभीत झालेल्या पती-पत्नीने अापल्या मुलाला बसस्टाॅपवर बाेलवून घेतले. सांगवीच्या शेवटच्या बस स्टाॅपला निलेश महाजन यांनी बसचालकाला पुन्हा अशा प्रकारे न वागण्याची विनंती केली. घडलेला प्रकार भीतीदायक असल्याने सुधा महाजन यांनी पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे यांना पत्र लिहून चालकावर कारवाई करण्याची मागणी केली अाहे. 

    या घटनेविषयी निलेश महाजन म्हणाले, घडलेली घटना अत्यंत दादागिरीची असून बसचालकाची शिवीगाळ करत दात पाडण्याची धमकी देण्याची मजल जातेच कशी? अशा बसचालकावर कठोर कारवाई व्हायला हवी. अशा गुंडगिरी प्रवृत्तीमुळे पीएमपीएमएलचे सर्व कर्मचाऱ्यांना त्याचा फटका बसतो व प्रवासी संख्या घटते.   दरम्यान या प्रकरणी दाेन्ही पक्षांचे म्हणणे एेकून याेग्य ती कार्यवाही करणार असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात अाले अाहे. 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलBus Driverबसचालकnewsबातम्या