शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षारक्षकांसमोरच पळवली पीएमपी बस

By admin | Updated: March 19, 2015 00:19 IST

सुरक्षारक्षकासमोरच एका चोरट्याने पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बस चोरून नेल्याची घटना मार्केट यार्ड येथे मंगळवारी मध्यरात्री घडली.

पुणे : सुरक्षारक्षकासमोरच एका चोरट्याने पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बस चोरून नेल्याची घटना मार्केट यार्ड येथे मंगळवारी मध्यरात्री घडली. पीएमपीच्या मार्केट यार्ड डेपोबाहेर रात्री बस उभ्या करण्यात आल्या होत्या. त्यातील एक बस अज्ञात व्यक्तीने नेली. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पीएमपीच्या बसला चालू करण्यासाठी चाव्याच नसल्याची धक्कादायक माहिती या घटनेवरून समोर आली आहे.पीएमपीच्या मार्केट यार्ड डेपोमधील बसला पार्किंग करण्यासाठी डेपोमध्ये पुरेशी जागा नसल्याने अनेक बस रात्री रस्त्यावर पार्क केल्या जातात. अशातच डेपोमध्ये कॉँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने बहुतांशी बस रस्त्यावरच उभ्या केल्या जातात. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे डेपोसमोर ही बस पार्क केली होती. बसच्या रखवालीकरिता ३ वॉचमन कार्यरत होते. रात्री पावणेदोनच्या सुमारास एक बस (क्र. एमएच १२ एफ सी ३१२५) सुरू करण्यात आल्याचे एका सुरक्षारक्षकाच्या लक्षात आले. पहिल्यांदा ती बस पीएमपीच्या चालकानेच चालू केल्याचे रक्षकाला वाटले. त्यामुळे रक्षकाने आवाज दिला. त्यानंतरही चालकाने बस न थांबविल्याने संबंधित रक्षकाने इतर सुरक्षारक्षकांना बोलविले. बसची चोरी होत असल्याचे लक्षात आल्याने सुरक्षारक्षकांनी एका चालकाच्या मदतीने दुसऱ्या बसमधून चोराचा पाठलाग केला. मार्केट यार्ड डेपोपासून उत्सव चौकापर्यंत हा पाठलाग करण्यात आला. मात्र, चोरट्याने बस जोरात चालविल्याने तो कोठे गेला, हे सुरक्षारक्षकांच्या लक्षात आले नाही. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात पीएमपीच्या सुरक्षा अधिकाऱ्याने तक्रार दाखल केली आहे. रात्री सायंकाळपर्यंत त्याचा तपास सुरू होता. (प्रतिनिधी)४मार्केट यार्ड डेपोत अशोक लेलॅन्ड कंपनीच्या अनेक बस आहेत. या बसला कंपनीने चाव्याच देण्यात आलेल्या नाहीत. या बस एका बटनावर चालू होतात. चोरीला गेलेली बस अशोक लेलॅन्ड कंपनीचीच होती. त्याला चावी नसल्याने चोरट्याला ती लगेचच चोरून नेणे शक्य झाले, असे मार्केट यार्ड आगाराच्या व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले.