शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात पीएमपी बसमध्ये प्रवासी होणार निर्जंतुक ; कर्मचाऱ्यांची कल्पना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 15:43 IST

पुढील काळात बसमध्ये सॅनिटायझर यंत्रणा बसवली जाणार...

ठळक मुद्देकाही बसमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरूवातदोन्ही दरवाज्यात ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या अंगावर सोडीयम हायपोक्लोराईडचा फवारा

पुणे : कोरोना विषाणुची लागण होऊ नये म्हणून सर्वच यंत्रणा सर्व तऱ्हेचे प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) ही मागे राहिलेले नाही. पीएमपी कर्मचाऱ्यांनी कोणापुढेही हात न पसरता उपलब्ध साधनसामुग्रीतून बसमध्येच सॅनिटायझर यंत्रणा तयार केली आहे. बसमध्ये ये-जा करणारा प्रत्येक प्रवासी या सॅनिटायझर फवारणीतून गेल्यानंतर निजंर्तुक होईल, याची दक्षता घेण्यात आली. हे प्रायोगिक तत्वावर असून त्यात आवश्यकतेनुसार आणखी बदल केले जाणार आहेत.पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांनापीएमपी कडून बससेवा पुरविली जात आहे. सध्या १०० हून अधिक बस मार्गावर धावत आहेत. दिवसभर मार्गावर धावलेल्या बस रात्री आगारामध्ये धुवून दुसऱ्या दिवशी पुन्हा मार्गावर आणल्या जातात. पण या बसमधून ये-जा करणारे प्रवासीही निजंर्तुक व्हायला हवेत, या भुमिकेतून कात्रज व कोथरूड आगारातील कर्मचाऱ्यांनी केवळ पाचशे रुपयांच्या खर्चात ही यंत्रणा तयार केली आहे. या यंत्रणेतून दोन्ही दरवाज्यात ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या अंगावर सोडीयम हायपोक्लोराईडचा फवारा सोडला जातो. ही यंत्रणा चालु-बंद करण्याचे काम चालकाच्या हातात देण्यात आले आहे. बसच्या वायपरच्या मोटारीचा त्यासाठी आधार घेतला आहे, असे कात्रज आगाराचे अभियंता विकास जाधव यांनी सांगितले. कोथरुड आगारात एका बसमध्ये तर कात्रज आगारात दोन बसेसमध्ये प्रायोगिक तत्वावर ही यंत्रणा सुरू झाली आहे. पुढील काळात आणखी बसमध्ये सॅनिटायझर यंत्रणा बसविली जाणार आहे.पीएमपी अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रणा सुरू करण्यात आली असून यासाठी जाधव यांच्यासह कोथरूड आगाराचे व्यवस्थापक चंद्रकांत वरपे, कर्मचारी राजाभाऊ पायगुडे, सागर जाधव, संजय हगवणे, राजेश पवार,अरविंद दुपटे, सुनिल पाटोळे, पप्पू भोसले यांनी प्रयत्न केले.

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडेpassengerप्रवासी