शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सिग्नल तोडल्यास पीएमपी बस चालकांना बसणार १२०० रुपये दंड; दोन दिवसांत दोन चालकांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 12:11 IST

निलंबनाची कारवाई होण्याची ही शक्यता

पुणे : पीएमपीच्या चालक आणि वाहकांबद्दलच्या तक्रारीचे प्रमाण वाढले आहे. बस चालविताना नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचे पीएमपी प्रशासनाच्या लक्षात आले असून, आता नियम मोडणाऱ्या चालक आणि वाहकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास चालकांना १२०० रुपये दंड भरावा लागणार असून, निलंबनाची कारवाई होण्याची ही शक्यता आहे.पीएमपीकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागात पीएमआरडीए कार्यक्षेत्रापर्यंत बससेवा पुरविली जात आहे. त्यामध्ये पीएमपी आणि ठेकेदारांच्या बसवरील चालक वाहतुकीच्या नियमांचे पालन करीत नसल्याबाबत प्रशासनाला वारंवार तक्रारी व सूचना प्राप्त होत आहे. या तक्रारीमध्ये प्रामुख्याने बस चालविताना मोबाईलवर बोलणे, झेब्रा क्रॉसिंगवर बस थांबविणे, धूम्रपान करणे, मार्ग बोर्ड न बदलणे, लेनच्या शिस्तीचे पालन न करणे, सिग्नल तोडणे या तक्रारींचा समावेश आहे.चालक-वाहकांच्या गैरवर्तनाबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारीचे निराकरण होण्याच्या दृष्टीने पीएमपीकडून चालक-वाहकांना सूचना देण्यात आली आहेत. बस चालविताना मोबाईल फोनचा वापर करू नये, वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, धूम्रपान करू नये, बसेस रस्त्यात उभ्या न करता बस स्टॉपवर उभ्या कराव्यात, लेनच्या शिस्तीचे पालन करावे, भरधाव वेगाने बसेस चालू नये, अशा विविध प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता चालक आणि वाहक नियमांचे पालन करतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.चालक आणि वाहकांना नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. नियमांचे पालन न केल्यास संबंधित चालक-वाहकांवर दंड आणि निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. प्रवासांच्या तक्रारीवरून आतापर्यंत दोन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.- सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक पीएमपी.इथे करा तक्रारपीएमपी बसमध्ये तुम्हाला आलेल्या अडचणी, तसेच बसच्या अवस्थेबाबत, स्वच्छतेबाबत, चालक-वाहकांची वर्तणुकीबाबत, सिग्नल तोडणे यांसह अन्य वाहतूक नियमांचे उल्लंघन बसचालकांकडून झाल्यास, किंवा बस या सर्व तक्रारी पीएमपीने उपलब्ध केलेल्या टोल फ्री क्रमांकावर कराव्यात. याकरिता ०२०-२४५४५४५४ हा टोल फ्री क्रमांक आहे. तसेच, ट्विटर एक्स, इन्स्टाग्राम, फेसबुक या पीएमपीच्या समाज माध्यमावरही फोटो, व्हिडीओ, बस क्रमांक (पाटीवरील मार्गाचे नाव), घटना घडलेल्या वेळेची माहिती देत, तक्रार करावी, असे आवाहन पीएमपीकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेBus DriverबसचालकPublic Transportसार्वजनिक वाहतूकTrafficवाहतूक कोंडीPoliceपोलिस