शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपी बसचा ब्रेक निकामी, चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे अपघात टळला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 13:29 IST

बीआरटी मार्गावरील लोखंडी दूभाजकाला धडकून बस थांवण्यात चालक यशस्वी ठरल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

पुणे : बीआरटी मार्गाने लोहगावकडे जाणाऱ्या कात्रज आगाराच्या बसचे भारती हॉस्पिटलसमोर ब्रेक निकामी झाल्यानंतर केवळ चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळल्याची घटना शनिवारी सकाळी दहा वाजता घडली. बीआरटी मार्गावरील लोखंडी दूभाजकाला धडकून बस थांवण्यात चालक यशस्वी ठरल्यामुळे मोठा अनर्थ टळला. क्रेनच्या सहाय्याने बस बाजूला घेण्यात आली. दरम्यान सातारा रस्त्यावर मंदावलेली वाहतूक सुरळीत झाली.कात्रज आगारामधील चालक विष्णू होंडे हे सकाळी बस ( एमएच.१२ एफसी. ३२९३) लोहगाववरुन एक फेरी मारुन आले होते. दुसरी फेरी साठी त्यांनी सकाळी ९.३० वाजता बस मार्गावर आणली. त्यावेळी बसमध्ये जवळपास पन्नास प्रवासी होते. भारती विद्यापीठचा उतार सुरू झाल्यानंतर ब्रेक निकामी झाल्याचे चालक विष्णू होंडे यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच ओरडून नागरिकांना बाजूला होण्यास सांगितले. आणि गाडी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन समोरील फुटपाथवर घातली . फुटपाथवर असलेल्या बाँलोर्डला धडकून गाडी थांबेल असा चालकाचा अंदाज होता. मात्र बाँलोर्ड तोडून गाडी पुढे गेली. पुढे पन्नास फुट खोली होती. आणि त्या खाली असलेल्या रस्त्यावर फेरीवाल्यांचा सात आठ गाड्या आणि नागरिकांची वर्दळ होती. त्यामुळे चालकाने प्रसंगावधान दाखवत बस उजव्या बाजूला असलेल्या बीआरटी मार्गावर घातली. तीव्र उतार असल्याने बस वेगात होती. त्यामुळे बस जवळपास सत्तर ते ऐंशी फुट लोखंडी दूभाजक तोडत तोडत पुढे जाऊन थांबली. दरम्यान भारती विद्यापीठ वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत क्रेनच्या साह्याने बस बाजूला घेतली. ठप्प झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली. 

टॅग्स :PuneपुणेDhankawadiधनकवडीPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडे