पुणे: पुण्याच्या राजकारणात 'धंगेकर पॅटर्न' राबवून भाजपला धूळ चारणाऱ्या रवींद्र धंगेकर यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात मतदारांनी मोठा धक्का दिला आहे. प्रभाग २३ आणि २४ या दोन्ही ठिकाणी धंगेकर कुटुंबाला पराभवाचा सामना करावा लागत आहे.
प्रभाग २३: प्रतिभा धंगेकर यांचा पराभवसर्वात खळबळजनक निकाल प्रभाग २३ मधून आला आहे. येथे रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांचा पराभव झाला आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) उमेदवार सोनाली आंदेकर यांनी धूळ चारली आहे. विशेष म्हणजे सोनाली आंदेकर या सध्या तुरुंगात असतानाही त्यांनी हा विजय मिळवला आहे.
प्रभाग २४: प्रणव धंगेकर पिछाडीवर (बिडकर विरुद्ध धंगेकर)प्रभाग २४ मध्ये भाजपचे दिग्गज नेते गणेश बिडकर यांनी पहिल्या फेरीपासूनच मोठी आघाडी घेतली आहे. रवींद्र धंगेकर यांचे चिरंजीव प्रणव धंगेकर हे सध्या दुसऱ्या क्रमांकावर असून बिडकर यांनी त्यांना मोठ्या फरकाने मागे टाकले आहे. जवळपास ३१०० मतांनी प्रणव धंगेकर पिछाडीवर आहे.
रवींद्र धंगेकरांचे खंदे समर्थक राहिलेले गणेश नवथरे यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवल्यामुळे धंगेकरांच्या मतांचे विभाजन झाले असून, त्याचा थेट फायदा भाजपच्या गणेश बिडकर यांना झाला आहे.
पहिल्या फेरीची आकडेवारी (प्रभाग २४ - ड):
गणेश बिडकर (भाजप): ७४५४ (आघाडीवर)
प्रणव रविंद्र धंगेकर (शिवसेना - शिंदे गट): ३३९७
गणेश नवथरे (राष्ट्रवादी - AP): ८८०
राहुल शर्मा (काँग्रेस): १२४७
सूर्यकांत आंदेकर - ५३
Web Summary : Ravindra Dhangekar's family faces electoral defeat in Pune. His wife lost to NCP candidate Sonali Andekar. His son, Pranav, trails BJP's Ganesh Bidkar significantly. Division of votes hurt Dhangekar's chances.
Web Summary : पुणे में रवींद्र धंगेकर के परिवार को चुनावी हार का सामना करना पड़ा। उनकी पत्नी एनसीपी उम्मीदवार सोनाली आंदेकर से हार गईं। उनके बेटे, प्रणव, भाजपा के गणेश बिडकर से काफी पीछे हैं। वोटों के विभाजन से धंगेकर की संभावनाओं को नुकसान हुआ।