शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

PMC Elections : महापालिका निवडणूक ‘आप’साठी ओळख निर्माण करणारी की मर्यादा स्पष्ट करणारी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 14:36 IST

पुण्यासारख्या सुशिक्षित, मध्यमवर्गीय व नागरी प्रश्नांबाबत जागरूक असलेल्या शहरात पक्षाला संधी असल्याचा दावा आपने केला आहे.

विश्लेषण 

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात नवा पर्याय म्हणून पुढे येणाऱ्या आम आदमी पार्टीकडे (आप) राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून उदयास आलेल्या या पक्षाने गेल्या काही वर्षांत दिल्ली व पंजाबमध्ये सत्ता मिळवली असली, तरी पुणे महापालिकेत पक्षाचा प्रवास अजून प्रारंभिक टप्प्यातच असल्याचे चित्र आहे.

आप’ची स्थापना २०१२ मध्ये झाली, तेव्हा महाराष्ट्रात सुरुवातीला विधानसभा व लोकसभा निवडणुकांत मर्यादित सहभाग घेतला. त्यानंतर तब्बल १३ वर्षांनतर पक्षाने महानगरपालिका निवडणुकांवर लक्ष केंद्रित करण्याची रणनीती आखली आहे. पुण्यासारख्या सुशिक्षित, मध्यमवर्गीय व नागरी प्रश्नांबाबत जागरूक असलेल्या शहरात पक्षाला संधी असल्याचा दावा आपने केला आहे.

सन २०१७ मध्ये पुणे महापालिका निवडणुकीत आपचा सहभाग अत्यंत मर्यादित होता. पक्षाने काही निवडक प्रभागांत उमेदवार उभे केले होते, मात्र एकही उमेदवार विजयी होऊ शकला नाही. बहुतांश उमेदवारांना शेकड्यात तर काहींना हजार मतांपर्यंत मजल मारता आली. त्यावेळी महापालिकेवर भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या पारंपरिक पक्षांचेच वर्चस्व होते.

‘आप’च्या उमेदवारांना मिळालेली मते ही मुख्यतः शहरी मध्यमवर्ग, तरुण मतदार आणि ‘पर्याय शोधणाऱ्या’ मतदारांकडून मिळाल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. मात्र मजबूत स्थानिक संघटना, ओळखीचे उमेदवार आणि आर्थिक ताकद यांचा अभाव पक्षाच्या कामगिरीवर परिणाम करणारा ठरला.

सध्यस्थिती आणि आगामी निवडणूक तयारी

आगामी निवडणूक सर्वच पक्षांसाठी महत्त्वाची आहे. या पार्श्वभूमीवर ‘आप’ने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाने आजपर्यंत ४१ उमेदवार जाहीर केले असून, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, वाहतूक, प्रदूषण आणि पारदर्शक कारभार हे प्रचाराचे मुख्य मुद्दे असणार आहेत. पुण्यात पक्षाचे संघटन गेल्या दोन-तीन वर्षांत वाढले असले, तरी इतर प्रमुख पक्षांच्या तुलनेत मर्यादित आहे. सध्या 'आप'चा महापालिकेत एकही नगरसेवक नाही; मात्र आगामी निवडणुकीत किमान काही जागांवर खाते उघडण्याचे पक्षाचे उद्दिष्ट आहे.

काही प्रभागातील राजकीय समीकरणांवर परिणाम

'आप'च्या उपस्थितीमुळे काही प्रभागांत पारंपरिक पक्षांच्या मतांमध्ये विभागणी होण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. विशेषतः शहरी मध्यमवर्गीय मतदारांमध्ये 'आप' हा ‘तिसरा पर्याय’ ठरतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

पुणे महापालिकेच्या राजकारणात आम आदमी पार्टीचा प्रवास अजून सुरुवातीच्या टप्प्यात असला, तरी पक्षाने आपले अस्तित्व नोंदवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. प्रत्यक्षात किती उमेदवार विजयी होतात आणि किती मते मिळतात, यावरच 'आप'ची पुण्यातील पुढील राजकीय दिशा ठरणार आहे. आगामी महापालिका निवडणूक ही 'आप'साठी ओळख निर्माण करणारी अथवा मर्यादाच स्पष्ट करणारी ठरेल, हे निकालांनंतरच स्पष्ट होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : PMC Elections: Will AAP make its mark or reveal limits?

Web Summary : AAP contests Pune Municipal Corporation elections, aiming to establish a presence. Past performance was limited. Focus is on middle-class voters and key civic issues. Success hinges on converting support into seats.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२६Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवाल