पुणे : पुणे महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी ९ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी मंगळवारी (दि. ३) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. महापालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष असल्याने त्यांचाच महापौर व उपमहापौर होणार हे निश्चित आहे. त्यामुळे महापौर व उपमहापौरपदाचा उमेदवार कोण असणार? एवढीच औपचारिकता बाकी आहे. भाजप अनुभवी नगरसेवकांना संधी देणार की धक्कातंत्राचा वापर करत नवीन चेहऱ्याला संधी देणार हे अवघ्या काही तासांत समोर येणार आहे.
नुकतेच झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने १६५ पैकी ११९ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे महापौर आणि उपमहापौरपद निवडीची केवळ औपचारिकता आहे. महापौरपद सर्वसाधारण गटातील महिलेसाठी राखीव आहे. या पदासाठी चाैथ्यांदा नगरसेविका झालेल्या वर्षा तापकीर, रंजना टिळेकर यांच्यासह तिसऱ्यांदा नगरसेविका झालेल्या मंजूषा नागपूरे, स्मिता वस्ते आणि मानसी देशपांडे यांची नावे चर्चेत आहेत तर हडपसरमधून प्रतिनिधित्व करणाऱ्या उज्ज्वला जंगले, मनीषा चोरबोले यांच्यासह पहिल्यांदाच महापालिकेत निवडून आलेल्या माजी मंत्री दिवंगत गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो.दुसरीकडे पहिल्या अडीच वर्षांच्या कालावधीत तीन महिलांना प्रत्येकी दहा महिने हे पद देण्याचा फॉर्म्युलाही ऐनवेळी वापरण्यात येऊ शकतो, अशी शक्यता भाजपच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपचा राज्यातील मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडून या निवडणुकीसाठी उमेदवारी द्यायचा की नाही? यावरून रात्री उशिरापर्यंत खल सुरू होता. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून या दोन्ही पदांसाठी उमेदवार दिला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
Web Summary : Pune's mayoral election on February 9th sees BJP likely to win. Speculation surrounds whether BJP will nominate experienced corporators or opt for a surprising, new face. Discussions are underway regarding potential candidates and strategies.
Web Summary : पुणे में 9 फरवरी को महापौर चुनाव में भाजपा की जीत की संभावना है। अटकलें हैं कि क्या भाजपा अनुभवी पार्षदों को नामांकित करेगी या आश्चर्यजनक, नए चेहरे को चुनेगी। संभावित उम्मीदवारों और रणनीतियों पर चर्चा चल रही है।