शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

PMC Elections अन्यायाविरोधात निवडणूक लढवण्याची तयारी; मला उमेदवारी द्यावी; संजीवनी कोमकरांची अजित पवारांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 13:16 IST

आयुष कोमकरच्या आई संजीवनी कोमकर यांनी माध्यमांशी बोलताना तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. आंदेकर कुटुंबियांना कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवारी देऊ नये, अशी कळकळीची विनंती त्यांनी केली.

पुणे - शहरातील कुख्यात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याने आगामी महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पुण्यातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात हा अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.  यापूर्वी सोनाली वनराज आंदेकर आणि लक्ष्मी उदयकांत आंदेकर यांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

अर्ज दाखल करण्यासाठी पोलीस बंदोबस्तात आलेल्या बंडू आंदेकरने यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. “नेकी का काम आंदेकर का नाम”, “बघा बघा मला लोकशाहीत कसं आणलंय”, “आंदेकरांना मत म्हणजे विकासकामाला मत” अशा घोषणा त्याने दिल्या. बंडू आंदेकर मोठमोठ्या आवाजात घोषणाबाजी करीत महापालिका निवडणुकीसाठी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात अपक्ष उमेदवार अर्ज दाखल करायला गेला खरा; मात्र अर्ज अर्धवट असल्यामुळे तो भरूनच घेतला नाही अशीही माहिती समोर येत आहे.दरम्यान, या घडामोडींवर आज आयुष कोमकरच्या आई संजीवनी कोमकर यांनी माध्यमांशी बोलताना तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. आंदेकर कुटुंबियांना कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवारी देऊ नये, अशी कळकळीची विनंती त्यांनी केली. त्या म्हणाल्या की, पोलिसांनी आणि न्यायालयाने आंदेकरला अर्ज भरण्याची परवानगी दिली असली तरी अर्ज भरण्यापूर्वी करण्यात आलेली घोषणाबाजी चुकीची होती. या प्रकरणी आपण न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.या आंदेकर आरोपींनी अनेक लोकांची घरे उध्वस्त केली आहेत. त्यांनी समाजासाठी काय काम केले आहे? माझे लोकांना आवाहन आहे की त्यांनी आंदेकरांना मतदान करू नये, त्यांना निवडून देऊ नये आणि कोणत्याही पक्षाने त्यांना उमेदवारी देऊ नये असे आवाहन संजीवनी कोमकर यांनी केले.त्या पुढे म्हणाल्या की, अन्यायाविरोधात लढण्यासाठी मी स्वतः निवडणूक लढवण्यास तयार असून त्यासाठी उमेदवारी देण्यात यावी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्देशून त्या म्हणाल्या, अजित पवार कोयता गँग थांबवा असे म्हणतात, मग आंदेकरांना तिकीट देऊ नये. आंदेकरांना कोण मदत करत आहे याची माहिती नसली तरी राजकीय लोक त्यांना मदत करत असल्याचा आरोप त्यांनी केला. जर कोणत्याही पक्षाने आंदेकरांना तिकीट दिले, तर त्या पक्षाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

 निवडणूक लढवण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नसल्याचे सांगत त्यांनी अपक्ष निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले. अजित पवार यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न केले असल्याचेही त्यांनी नमूद केले. संजीवनी कोमकर यांनी पुढे स्पष्ट केले की, वनराज आंदेकर हा त्यांचा भाऊ असला तरी वनराज आंदेकर हत्या प्रकरणाशी त्यांचा किंवा त्यांच्या कुटुंबाचा कोणताही संबंध नाही. मी माझ्या भावाची सुपारी का देईन? आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही, तरीही आम्हाला भोगावे लागत आहे, असे त्या म्हणाल्या. त्यांनी आंदेकर कुटुंबावर गंभीर आरोप करत विजय निंबाळकर, निखिल आखाडे, आयुष कोमकर आणि गणेश काळे यांच्या हत्यांचा उल्लेख केला. या संपूर्ण प्रकरणामुळे पुण्यातील राजकीय वातावरण तापले असून, आंदेकर कुटुंबाच्या उमेदवारीवरून पुढील काळात वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : PMC Elections: Sanjeevani Komkar seeks candidacy to fight injustice.

Web Summary : Sanjeevani Komkar demands candidacy against the Andekar family's election bid, alleging criminal activities. She appeals to Ajit Pawar to deny them tickets and threatens protests if any party supports them, citing past violence.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२६PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीAjit Pawarअजित पवारElectionनिवडणूक 2025