शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

PMC Election 2026 :पुण्यात पाणी, वाहतूक आणि स्वच्छतेचे प्रश्न सोडवू; इच्छाशक्ती असेल तर बदल शक्य - सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 12:14 IST

मी ज्या भागात राहते तिथेसुद्धा पाण्याची अडचण आहे. शहरात राहूनही पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो, यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या.

पुणे - दादांनी सगळ्या मुद्द्यांवर सविस्तर भूमिका मांडली आहे. पुण्याच्या प्रश्नांची आम्हाला पूर्ण जाणीव आहे आणि त्यावर उपाय काढण्याचा आमचा ठाम निर्धार आहे,” असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. पुण्यातील पाणी प्रश्नावर बोलताना त्यांनी टँकर माफियाचा उल्लेख करत सांगितले की, हा अनुभव त्यांनाही आहे. “मी ज्या भागात राहते तिथेसुद्धा पाण्याची अडचण आहे. शहरात राहूनही पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो, यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या. मेट्रोबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मेट्रोचा शेवटचा कनेक्टिव्हिटी टप्पा पूर्ण झाल्यावरच त्याचा खरा उपयोग कळतो. प्रत्येक मेट्रो स्थानक पूर्ण क्षमतेने सुरू झाले पाहिजे. वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर असल्याचे मान्य करत त्यांनी सांगितले की, पुढील दोन ते तीन वर्षांत वाहतूक समस्या सोडवण्यासाठी ठोस उपाय करून दाखवू.त्या पुढे म्हणाल्या, शहराचा वाढता खर्च कमी करण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यावर भर दिला जाईल. “सोलर प्रकल्पांमुळे विजेचा खर्च कमी करता येतो आणि पर्यावरणालाही फायदा होतो असे त्यांनी नमूद केले. पुणे स्वच्छ, सुंदर आणि गुन्हेगारीमुक्त व्हावे ही आमची भूमिका आहे. यातील अनेक कामे आम्ही यापूर्वी करून दाखवली आहेत, तर अनेक ठिकाणी कामे आधीच सुरू आहेत,” असे त्या म्हणाल्या. हे सगळे शक्य आहे, फक्त त्यासाठी इच्छाशक्ती लागते आणि ती आमच्यात आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शेवटी पुणेकरांना आवाहन करत सुप्रिया सुळे म्हणाल्या, घड्याळ-तुतारी बटण दाबा, आम्ही जे सांगतो ते करून दाखवतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Supriya Sule vows to solve Pune's water, traffic, sanitation issues.

Web Summary : NCP leader Supriya Sule pledges to address Pune's water scarcity, traffic congestion, and cleanliness in the upcoming PMC election. She emphasized the need for permanent solutions, better metro connectivity and solar energy for sustainable development. Sule assured that with strong will, change is possible.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६PuneपुणेPMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२६Maharashtraमहाराष्ट्रSupriya Suleसुप्रिया सुळे