वारजे : प्रभाग क्रमांक ३० (कर्वेनगर हिंगणे होम कॉलनी) मधील क गटातील महिला उमेदवार प्रतीक्षा जावळकर यांच्या जुन्या जकात नाका परिसरातील ऑफिससमोर कोणीतरी मंगळवारी (ता. ३०) सकाळी लिंबू-मिरची टाकून करणी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून आले. यामुळे या परिसरात हा चर्चेचा विषय झाला आहे.
याबाबत स्थानिक कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार येथील डी मार्ट चौकात शिवसेना शाखा व जावळकर यांचे कार्यालय आहे. मंगळवारी फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस होता. निवडणूक लढविणाऱ्या अनेक मातब्बरांनी शेवटच्या क्षणापर्यंत धावाधाव करून फॉर्म भरला. त्यामुळे या गटातून लढणाऱ्या कोणी तरी खोडसाळपणामुळे सकाळीच हे कृत्य त्याचा फॉर्म भरण्यापूर्वी केला असावा, असा संशय व्यक्त होत आहे.
सकाळी शिवसेना कार्यकर्त्यांनी ऑफिस उघडल्यावर त्यांना दाराजवळच ७ लिंबू व काही मिरच्या टाकून दिलेल्या आढळल्या. हे ऑफिस मागच्याच महिन्यात इकडे स्थानांतरित झाल्याने अद्याप कॅमेरे बसविले नसल्याने हे कृत्य कोणी केले, हे मात्र समजू शकले नाही. विशेष म्हणजे शिंदेसेनेकडून पहिल्यांदाच निवडणुकीस सामोरे जात असलेल्या जावळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज सोमवारीच दाखल केला होता. मंगळवारी मात्र त्यांनी इतर गटांतील सहकारी उमेदवारांना फॉर्म भरण्यास मदत म्हणून वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय गाठले.
Web Summary : Someone placed lemons and chilies outside a Warje candidate's office, seemingly a superstitious act. The incident occurred before she submitted her form, raising suspicions of foul play by rivals. The office lacked security cameras.
Web Summary : वारजे में एक उम्मीदवार के कार्यालय के बाहर किसी ने नींबू और मिर्च रखकर 'टोटका' किया। यह घटना पर्चा दाखिल करने से पहले हुई, जिससे प्रतिद्वंद्वियों द्वारा गड़बड़ी की आशंका जताई जा रही है। कार्यालय में सुरक्षा कैमरे नहीं थे।