पुणे : महापालिकेच्या २०१७ मधील निवडणुकीत एकसंघ शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले सर्व दहा माजी नगरसेवकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. त्यामुळे महापालिकेची निवडणूक ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून लढण्याची संधी नव्या चेहऱ्यांना मिळणार आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने काही निवडणुका सोडल्या तर बहुसंख्य निवडणुका भाजपसोबत युती करून लढवल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मात्र स्थानिक राजकीय परिस्थितीनुसार लढवल्या आहेत. पुणे महापालिकेची २०१७ च्या निवडणुकीचा विचार करत भाजप आणि शिवसेनेने स्वतंत्रपणे निवडणूक लढली. त्यामध्ये भाजपचे ९७ तर शिवसेनेचे १० नगरसेवक निवडून आले. त्यानंतर शिवसेने महापालिकेत पाच वर्षे विरोधक म्हणून काम केले.
दरम्यानच्या काळात शिवसेनेने भाजपची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत घरोबा करून राज्याची सत्ता काबीज केली. महापालिका सभागृहाची मुदत २०२२ मध्ये संपल्यानंतर महापालिकेची निवडणूक झाली नाही, महापालिकेत प्रशासक राज आले. त्यानंतर राज्यात राजकीय उलथापालथ होऊन शिवसेनेचे दोन तुकडे झाले आणि राज्याची सत्ता भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या हाती गेली. शिवसेनेचे तुकडे झाल्यानंतर महापालिकेतील १० माजी नगरसेवकांपैकी केवळ नाना भानगिरे हे एकमेव माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले.
विधानसभेच्या २०२४ च्या निवडणुकीत राज्यात भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची सत्ता आल्यावर बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे ठाकरे सेनेचे विशाल धनवडे, बाळा ओसवाल, प्राची अल्हाट, संगीता ठोसर आणि पल्लवी जावळे या पाच माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तत्पूर्वी माजी नगरसेवक ॲड. अविनाश साळवे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे सेनेत केवळ माजी गटनेते संजय भोसले आणि पृथ्वीराज सुतार हे दोनच माजी नगरसेवक राहिले होते. मात्र, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भोसले आणि सुतार या दोघांनीही मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केल्याने ठाकरे सेनेकडे मावळत्या सभागृहातील एकही माजी नगरसेवक राहिलेला नाही. त्यामुळे महापालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये ठाकरे सेनेकडून नवख्या शिवसैनिकांना संधी द्यावी लागणार आहे.
Web Summary : Ahead of Pune Municipal Corporation elections, all ten ex-corporators from Thackeray's Sena defected. This exodus paves the way for fresh faces to contest under the Thackeray Sena banner. Key leaders joined BJP and Congress, leaving no former corporators with the party.
Web Summary : पुणे महानगरपालिका चुनावों से पहले, ठाकरे सेना के सभी दस पूर्व पार्षदों ने दलबदल कर लिया। इस पलायन से ठाकरे सेना के बैनर तले नए चेहरों को चुनाव लड़ने का मौका मिलेगा। प्रमुख नेता भाजपा और कांग्रेस में शामिल हो गए, जिससे पार्टी के पास कोई पूर्व पार्षद नहीं बचा।